डॉ.झाकेर हुसेन शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

डॉ.झाकेर हुसेन शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

सेलू :  नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सेलू शहरातील डॉ. झाकेर हुसेन प्राथमिक शाळेत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके, शालेय गणवेश दप्तरे वाटप करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेलू शहरातील मदीना मशिदीचे ईमाम व खतीब हाजी शेख रईस खासमी उर्फ ​​ख्वाजा मौलाना साहब यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून शेख कलीम भाई बेलदार, परभणी जिल्हा अध्यक्ष बेलदार समाज सेवा मंडळ,पत्रकार अबरार बेग, हाफेज ख्वाजा भाई सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांना संपूर्ण पाठ्यपुस्तके,  शालेय गणवेश आणि मजबूत आणि सुंदर शालेय दप्तरे देण्यात आली. शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. झाकेर हुसेन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अलहाज मोहम्मद अब्दुल अलीम सोफी शिक्षक शेख मोहम्मद लईख,इरशाद खान, शेख रिझवान,सय्यद हमीद भाई, सय्यद साबेर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने पालक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला नवीन पुस्तके आणि गणवेश मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!