मराठवाडा हायस्कूलच्या गुणवंतांचा सत्कार

मराठवाडा हायस्कूलच्या गुणवंतांचा सत्कार

परभणी : येथील एनव्हीएस मराठवाडा हायस्कूलच्या शिवाजीनगर शाखेतील इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.संगीता बिरगे यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी नूतन विद्या समितीचे उपाध्यक्ष अनिल अष्टुरकर होते. याप्रसंगी चिटणीस संतोष धारासुरकर, प्राचार्य अनंत पांडे, व्यंकटेश तोरंबेकर, बाळकृष्ण कापरे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.

डॉ.बिरगे यांनी नूतन विद्या समिती आणि मराठवाडा हायस्कूलच्या शैक्षणिक वाटचालीचे कौतुक करत, ही शाळा गुणवंतांची खाण असल्याचे सांगितले. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन, जिद्द आणि कठोर मेहनत करत आपले करिअर घडवावे, असे आवाहन केले. चिटणीस धारासुरकर यांनी; गुणवान, चरित्रवान आणि सक्षम विद्यार्थी घडवण्यावर संस्थेचा भर असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात अष्टुरकर यांनी शाळेतील सहशालेय उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असल्याचे नमूद केले. या वेळी दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळविलेल्या आदिती जाधव आणि मोक्षदा गरुड तसेच उत्कर्ष कावळे (९९ टक्के) यांसह ९५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या १७ आणि ९० टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या ३१ आणि विशेष प्राविण्यातील १०५ विद्यार्थी, संगीत, चित्रकला, शिष्यवृत्ती, एमटीएस परीक्षांमधील गुणवंतांचाही गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन शिवप्रसाद कोरे यांनी केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!