धनगर समाजातील गुणवंतांचा सत्कार
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विचारमंचचा उपक्रम
परभणी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती सोहळ्यात धनगर समाजातील इयत्ता दहावी, बारावी, सीईटी,नीट, शिष्यवृत्ती, एन.एम.एम.एस., श्रेया, ऑलिम्पियाड परीक्षा तसेच स्पर्धा परीक्षेद्वारे शासकीय सेवेत रुजू होणाऱ्या गुणवंतांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विचारमंचच्या वतीने हा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. अध्यक्षस्थानी सेवानिवृत पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत साखरे होते. याप्रसंगी जिंतूरचे गट शिक्षणाधिकारी त्र्यंबकराव पोले, जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, डॉ.ए.एल.शेळके, माणिकराव जुमडे, विठ्ठल शेळके, प्रा.बलभीम माथेले यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.शेळके यांनी आपल्या भाषणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्ण इतिहास अत्यंत सोप्या शब्दात आणि सविस्तर सांगितला.
या वेळी प्रभाकर बारहाते यांनी आपले बंधू सुरेश जीवनाजी बारहाते यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी धनगर समाजातून नीट परीक्षेत जिल्ह्यात प्रथम येऊन एमबीबीएस अभ्यासक्रमास प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास रोख ५००१ रुपयांचे पारितोषिक जाहीर केले.
प्रास्ताविक अनंत बनसोडे तर सूत्रसंचालन श्री. बसुळे, आभार प्रदर्शन कोकणे यांनी केले. रामकिशन रोंदळे, प्रा.तुकाराम साठे, प्रा.प्रसाद लेंगुळे यांच्यासह समाजबांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री.किंगरे, श्री.शेंगुळे, श्री.तुडमे, विचारमंच, बचतगटाच्या पदाधिकारी व सदस्यांनी पुढाकार घेत