शिक्षकांच्या प्रश्नांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार
मुंबईतील आंदोलनात प्रा.किरण सोनटक्के यांची भूमिका
परभणी : अशंत अनुदानित खाजगी शाळांतील शिक्षकांना १०० टक्के अनुदानासह १०० टक्के पगार देण्यात यावा. या मागणीसाठी मागील सात दिवसांपासून मुंबई येथील आझाद मैदानावर शिक्षक समन्वय संघाचे आंदोलन सुरू आहे. मंगळवारी, २४ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलचे (शरदचंद्र पवार) मराठवाडा अध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के यांनी पदाधिकाऱ्यांसह आंदोलनात सहभाग नोंदवला. राज्यातील अशंत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांतील ६० हजारांवर शिक्षक न्याय मागण्यासाठी सातत्याने संवैधानिक मार्गाने संघर्ष करीत आहेत. आपण शिक्षकांसोबत सदैव आहोत. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत आणि न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहणार असल्याचे प्रा.सोनटक्के यांनी या वेळी स्पष्ट केले.
राज्यातील अशंत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांतील ६० हजारांवर शिक्षक न्याय मागण्यासाठी सातत्याने संवैधानिक मार्गाने संघर्ष करीत आहेत. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार आहे, असे प्रा.सोनटक्के म्हणाले. विधानसभा निवडणुकीपूर्वी अनुदानाबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतली होती. पत्रही काढले होते. मात्र, राज्य सरकारच्या वतीने मांडलेल्या २०२५-२६ या वर्षीच्या राज्य अर्थसंकल्पात अंशतः अनुदानीत व अघोषीत शाळांच्या टप्पा अनुदानासाठी कुठलीही तरतुद केलेली नाही. आश्वासन देऊनही कोणताही विचार केला गेला नाही, असा आरोप करीत यामुळे राज्यातील ६० हजार शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे, असे प्रा.सोनटक्के यांनी नमूद केले. आझाद मैदानावरील आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी होत आहेत. काही महिला आंदोलकांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. शिक्षकांच्या या मागण्यासाठी राज्यातील सर्व शिक्षक संघटना एकत्र आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.