दिव्यांगांना शैक्षणिक साहित्य वाटप करून  ‘बॅंके डे’ साजरा

दिव्यांगांना शैक्षणिक साहित्य वाटप करून  ‘बॅंके डे’ साजरा

परभणी : भारतीय स्टेट बँक आणि परभणी जिल्हा अग्रणी बँकयांच्या संयुक्त विद्यमाने स्टेट बँकेच्या ७० व्या स्थापना दिवसाच्या ( बॅंक डे) निमित्ताने दिव्यांग विद्यार्थ्यांना गणवेश वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम मंगळवारी १ जुलै रोजी उत्साहात पार पडला.

अध्यक्षस्थानी परभणीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे होते. बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक दिनेश कुमार झा,अग्रणी बँकेचे व्यवस्थापक  रामचंद्र आकुलवार, आर्थिक सल्लागार सुनील हट्टेकर, व्यवस्थापक नरेंद्र जवळेकर, निलेश पटेल, गणेशराव घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी कांचन त्र्यंबकराव कत्रुवार कर्णबधिर विद्यालय आणि रीना करेवार मनोविकास विद्यालयातील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. डॉ.काळे यांनी कृषी दिवस, डॉक्टर दिवस आणि बँक डे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी शाळेतील स्वच्छतेबद्दल समाधान व्यक्त केले आणि संस्थेला शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल अशी ग्वाही दिली.सूत्रसंचालन सुखदेव धूळधुळे यांनी केले,  मुख्याध्यापक मधुकर नायक, नीलिमा साळुंके आदींची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!