नूतन शिक्षण संस्थेतर्फे गुणवंतांच्या सत्काराचे आयोजन

नूतन शिक्षण संस्थेतर्फे गुणवंतांच्या सत्काराचे आयोजन

सेलू : नूतन विद्यालय शिक्षण संस्था, सेलू, आपला ८६ वा वर्धापनदिन आणि श्रीरामजी भांगडिया स्मृतिदिन उत्साहात साजरा करत आहे. या निमित्ताने, संस्थेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ गुरुवार, ३ जुलै रोजी दुपारी ३:३० वाजता नूतन विद्यालयाच्या कै. रा. ब. गिल्डा सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया असतील. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे माजी विद्यार्थी आणि प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. राजेश मंत्री (परभणी) आणि निवृत्त वनाधिकारी टी. के. कुलकर्णी (सेलू) उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवावे, असे आवाहन नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डी. के. देशपांडे गुरुजी, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी आणि कार्यकारिणी मंडळाने केले आहे.


Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!