मुलांनो, गुणांबरोबर सद्गुण संपादन करा : टी.के.कुलकर्णी

मुलांनो, गुणांबरोबर सद्गुण संपादन करा : टी.के.कुलकर्णी

नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या गुणवंतांचा सत्कार, ८६ वा संस्था वर्धापन दिन आणि भांगडिया स्मृतिदिनानिमित्त उपक्रम

सेलू : सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचा ८६ वा वर्धापनदिन व श्रीरामजी भांगडिया स्मृतिदिनानिमित्त गुरुवारी, ३ जुलैरोजी घटक संस्थांतील विविध परीक्षेतील गुणवंत, राष्ट्रीय खेळाडू व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या वेळी मार्गदर्शन करतांना प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त वनाधिकारी टी.के.कुलकर्णी म्हणाले की,  विद्यार्थ्यांनी एक चांगला माणूस व्हावे. माणुसकीने वागावे. प्रगतीपुस्तकावरील गुणांबरोबर सद्गुण संपादन करावेत.

अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी नेत्रतज्ज्ञ डॉ.राजेश मंत्री (परभणी), निवृत्त वनाधिकारी टी. के. कुलकर्णी यांची उपस्थिती होती. याप्रसंगी उपाध्यक्ष डी. के. देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, कार्यकारिणी सदस्य सिताराम मंत्री, प्राचार्य डॉ. यु. एस. राठोड, प्रभारी मुख्याध्यापक रोहिदास मोगल, निशा पाटील, सुखानंद बेंडसुरे, एन.पी.पाटील आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.  डॉ.राजेश मंत्री म्हणाले, ” विद्यार्थ्यांनी अभ्यास, परिश्रमातून गुणवत्तापूर्ण शैक्षणिक प्रमाणपत्र मिळवावे. पण त्यासोबतच जीवन सर्वार्थाने सक्षम करण्यासाठी प्राविण्य प्राप्त करावे. पुस्तकांच्या वाचनातून आपला व्यक्तिमत्त्व विकास करावा. पालक लक्ष्मण जाधव, विद्यार्थिनी स्वरा लाटकर यांनी मनोगत व्यक्त केले. वार्षिक अहवाल जयप्रकाश बिहाणी यांनी मांडला. प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. डॉ.लोया यांनी समारोप केला. प्रास्ताविक डाॅ.कोठेकर यांनी केले. सूत्रसंचालन अशोक लिंबेकर यांनी, तर बाबासाहेब हेलसकर यांनी आभार मानले. प्राचार्य एन.पी. पाटील, अनिल रत्नपारखी, कीर्ती राऊत यांनी यादी वाचन केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!