आषाढी एकादशी : नूतन विद्यालयाच्या देखाव्याने वेधले लक्ष

सेलू : येथील नूतन विद्यालयाच्या ज्ञानदिंडीची सुरूवात संस्थाध्यक्ष डॉ.एस.एम.लोया यांच्या हस्ते श्री विठ्ठल रखुमाई प्रतिमा पूजनाने झाली. या वेळी उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, जयप्रकाश बिहाणी, सीताराम मंत्री, दत्तराव पावडे, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, रोहिदास मोगल आदींची प्रमुख उपस्थिती होती. यानिमित्ताने शाळेच्या वतीने श्री विठ्ठल रखुमाई व संतांचा स्थिर सजीव देखावा सादर करून उपस्थितांची मने जिंकली.