शेतकऱ्यांनी तत्काळ ‘अँग्रिस्टॅक’ ओळख क्रमांक तयार करावा – जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे

परभणी : राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून विविध शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत अधिक जलद व प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी केंद्र शासनाने अँग्रिस्टॅक योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र शासनाने १४ ऑक्टोबर २०१४ रोजी या योजनेला मान्यता दिली आहे.
परभणी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी अद्याप अँग्रिस्टॅक ओळख क्रमांक तयार केलेला नाही. यामुळे पीएम किसान योजना, पीक विमा योजना, दुष्काळी अनुदान, शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान यांसारख्या योजनांचा लाभ घेण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात, असे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितले.
कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी १५ एप्रिल २०२५ पासून अँग्रिस्टॅक ओळख क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी अद्याप हा क्रमांक घेतलेला नाही, त्यांनी तातडीने नजीकच्या सीएससी केंद्राशी संपर्क साधावा संकेतस्थळावर स्वतः जाऊन शेतकरी ओळख क्रमांक तयार करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी गावडे यांनी केले आहे.