‘शाळा बंद’ आंदोलनाला परभणी जिल्ह्यात मोठा प्रतिसाद

‘शाळा बंद’ आंदोलनाला परभणी जिल्ह्यात मोठा प्रतिसाद

टप्पा अनुदानासाठी उद्याही शाळा बंदची हाक

परभणी : महाराष्ट्रातील सुमारे ६५ हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी टप्पा अनुदानापासून गेल्या तीन वर्षांपासून वंचित आहेत. या निषेधार्थ दि. १६ जूनपासून आझाद मैदानावर शेकडो शिक्षक उपोषणाला बसले आहेत. तात्काळ टप्पा अनुदान जाहीर करण्यासाठी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने ८ व ९ जुलै रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाची हाक देण्यात आली होती. मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी परभणी जिल्ह्यातील शहरी भागातील शंभर टक्के शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या, असा दावा समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच टप्पा अनुदानित शिक्षक समन्वय संघाला जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना समितीने शाळा बंद ठेवून पाठिंबा दिला आहे.

१५ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या शासन निर्णयानुसार टप्पा अनुदान देण्यासाठी आर्थिक तरतूद करून टप्पा अनुदान द्यायला पाहिजे होते; परंतु सरकारने शासन निर्णय काढून त्या निर्णयाला केराची टोपली दाखवत शाळांना आणि शिक्षकांना टप्पा वाढ अनुदानापासून वंचित ठेवले. त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व संघटनांनी एकजूट होऊन ८ व ९ जुलै रोजी शाळा बंद ठेवून टप्पा अनुदान पात्र शाळा आणि शिक्षकांना पाठिंबा दिला. शाळा बंद आंदोलन यशस्वीतेसाठी समन्वय समिती, शिक्षण संस्थाचालक महामंडळ, शिक्षक सेना, मुख्याध्यापक संघ, राष्ट्रवादी शिक्षक संघटना, मराठवाडा शिक्षक संघ आदी संघटनांनी सक्रिय सहभाग घेतला.

शिक्षक सेनेचे विभागीय कार्याध्यक्ष बाळासाहेब राखे, जिल्हाध्यक्ष दिगंबर मोरे, गुलाब हरकळ, महानगराध्यक्ष प्राचार्य प्रकाश हरगावकर, प्रा. जयशंकर राखुंडे, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे केशव अण्णा दुधाटे, जिल्हाध्यक्ष पी. आर. जाधव, तसेच मराठवाडा शिक्षक संघाचे यशवंत मकरंद, मुख्याध्यापक संघाचे देविदास उमाटे, बालासाहेब भांगे, गोविंद चोरघडे, शेख शरीफ आणि टप्पा अनुदानित शिक्षक समन्वय संघाचे सर्व शिक्षक पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले. सेलू तालुक्यात आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला. मराठवाडा शिक्षक संघातर्फे शाळांना भेटी देऊन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. रामेश्वर घनवट, बालाजी बुधवांत, पांडुरंग सोळंके,दत्ता नाईकनवरे, एम.ए.सोळंके, लिपणे, के.व्ही.जाधव , व्ही.बी. सुवर्णकार, ए. एस.गावंडे,  डॉ. संतोष मलसटवाड, अनंतकुमार विश्वंभर, व्ही.यू.धापसे आदींनी पुढाकार घेतला.

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!