Maharashtra Talent Search Exam 2025 : नूतन विद्यालयाच्या १२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
सेलू : नौरोसजी वाडिया महाविद्यालय पुणे यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रज्ञाशोध (एमटीएस) परीक्षेत येथील नूतन विद्यालयाने नेत्रदीपक यश संपादन केले आहे. विद्यालयातून सहभागी झालेल्या ८० विद्यार्थ्यांपैकी तब्बल ७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यापैकी १२ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. विभागप्रमुख सुधीर जोशी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, चिटणीस प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहचिटणीस जयप्रकाश बिहाणी, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, मुख्याध्यापक संतोष पाटील, प्रभारी मुख्याध्यापक किरण देशपांडे, विभागप्रमुख एस.एल.जोशी यांनी कौतुक केले आहे.
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी याप्रमाणे : इयत्ता ८वी : विशेष पारितोषिक : अर्णव विशाल क्षीरसागर – १५१ गुण, साईराज अनिल दौड – १४८ गुण, तालुका पारितोषिक आरिजखाँन आजेमखाँन पठाण – १४२ गुण, शिवम सुभाष वैद्य – १४१ गुण, उत्तेजनार्थ पारितोषिक दत्तप्रसाद गंगाधर लव्हराळे – १३६ गुण, विनय गणेश बेले – १२८ गुण,
इयत्ता ९वी : जिल्हा पारितोषिक : सक्षम सुरेश आर्दड – १४६ गुण, विशेष पारितोषिक : सोहम सुरेश आर्दड – १३८ गुण, तालुका पारितोषिक आर्या भाऊराव घांडगे – १३२ गुण, इयत्ता १०वी : विशेष पारितोषिक : स्वरा रविंद्र लाठकर – १४९ गुण, श्लोक लक्ष्मीकांत कुलकर्णी – १४८ गुण, तालुका पारितोषिक : महेश तुकाराम भाबट – ११८ गुण