संतवाणी : आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने…
नूतन विद्यालयातील ‘संतवाणी’ ने श्रोते मंत्रमुग्ध, वृक्षदिंडीने वेधले लक्ष
परभणी : सेलू येथील नूतन विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त मंगळवारी, ८ जुलै रोजी सायंकाळी ‘संतवाणी’ भक्ती संगीत मैफिल आयोजिण्यात आली होती. गीतमंचच्या विद्यार्थ्यांनी ‘घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे’, ‘आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने,’ ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी’, ‘काटे केतकीच्या झाडा’, ‘विठू माझा लेकुरवाळा’ आदी अभंग,गौळण आणि भारुडाचे उत्तम सादरीकरण करत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. राधिका परदेशी, गीत राठोड, कृष्णा पवार, वैष्णवी बोठे, सिद्धी शिंदे, प्रज्योत पांचाळ, श्रुती कुलकर्णी, ऋतुजा महाजन, अथर्व तोडकर, अनुष्का वाघ, चैतन्य सावजी, प्रशांत इंगळे, रोहन वाघमारे, अवधूत दहिवाल, कार्तिक सातपुते, मयुर मेहता, आनंद राऊत, कार्तिक हिंगणे, भक्ती शिंदे यांनी यामध्ये सहभाग घेतला. नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, जयप्रकाश बिहाणी, सीताराम मंत्री, दत्तराव पावडे, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, मकरंद दिग्रसकर, किरण देशपांडे रोहिदास मोगल, शंकर बोधनापोड, परसराम कपाटे, अंबादासराव पावडे, सर्जेराव लहाने यांच्यासह विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन मृण्मयी इक्कर हीने सूत्रसंचालन केले. सच्चिदानंद डाखोरे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी अशोक लिंबेकर, शिल्पा बरडे, डॉ.सुरेश हिवाळे, शैलजा कवुटकर आदींनी सहकार्य केले. यानिमित्ताने काढण्यात आलेल्या ग्रंथ दिंडीने लक्ष वेधून घेतले.