येलदरी जलाशयात ६२.३८ टक्के पाणीसाठा

येलदरी जलाशयात ६२.३८ टक्के पाणीसाठा

परभणी : पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयात गुरुवार, २४ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत ६२.३८ टक्के एवढा जिवंत पाणीसाठा उपलब्ध होता. या प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता ९३४.४४० दशलक्ष घनमीटर असून, यामध्ये १२४.६७० दशलक्ष घनमीटर हा मृत साठा आहे, तर ८०९.७७० दशलक्ष घनमीटर जिवंत साठा मानला जातो. सद्यस्थितीत धरणात ५०५.१०४ दशलक्ष घनमीटर जिवंत साठा असून, एकूण पाणीसाठा ६२९.७७४ दशलक्ष घनमीटर इतका झाला आहे. यामुळे येलदरी धरण सध्या ६२.३८ टक्के क्षमतेने भरलेले आहे.

गेल्या २४ तासांमध्ये धरणात १०.९५० दशलक्ष घनमीटर स्थानिक पाण्याची आणि ११०.१६० दशलक्ष घनमीटर एकूण जलआवक झाली आहे. याच कालावधीत परिसरात ३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, हंगामातील एकूण पावसाचा आकडा २४५ मिलिमीटरवर पोहोचला आहे, अशी माहिती पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!