सेलूमध्ये विविध कार्यक्रम, कव्वालीचा शानदार मुकाबला
सेलू : सेलू शहरातील प्रसिद्ध कामिल अवलिया हजरत सय्यद शाहबुद्दीन सय्यद बुरहानुद्दीन यांच्या ऊरुसाला बुधवारपासून (१५ जून) सुरुवात होत आहे. या निमित्ताने संदल, कव्वालीचा शानदार मुकाबला आदी विविध कार्यक्रम होत आहेत.
१५ जूनरोजी असरच्या नमाजनंतर सहा वाजता गुसल स्नान झाल्यावर चादर पुष्प चढविण्यात येणार आहे. मुल्ला मस्जिदचे पेशइमाम हाफीज शफीकखान रिझवी हे दुरुद फातेहा पठण करतील. 16 जूनरोजी झोहर नमाजनंतर दोन वाजता संदलची सुरुवात उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार, तहसीलदार दिनेश झांपले, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. 17 जून, शुक्रवाररोजी उर्स व सायंकाळी कव्वालीचा शानदार मुकाबला आहे. 18 जून, शनिवारी फजर नमाजनंतर सकाळी सहा वाजता तब्रुख भोजनप्रसाद कार्यक्रम आहे.
ऊर्साच्या कार्यक्रमात सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दर्गा शरीफचे मुत्वल्ली सय्यद कबीर सय्यद अमीरनानू, उर्स कमिटीचे उरुजअली खान, इकबाल मोदी, सिद्दिक लष्करिया, शेख वाजीद, पत्रकार शेख आरेफभाई, अबरार बेग, शेख गफारभाई जरगर आदींनी केले आहे.