मंत्री अतुल सावे यांचा परभणी जिल्हा दौरा

कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांचा परभणी जिल्हा दौरा 

मुख्य शासकीय ध्वजारोहण, विविध कार्यक्रमांना उपस्थिती

परभणी : राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे हे रविवारपासून परभणी दौऱ्यावर येत असून, सोमवारी ( १५ ऑगस्ट) सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण करतील. 

मंत्री अतुल सावे यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : रविवार, 14 ऑगस्ट,2022 रोजी सायंकाळी 5.30 वाजता सावली शासकीय विश्रामगृह, परभणी येथे आगमन होणार आहे. सायं. 6.00 वाजता सावली शासकीय विश्रामगृह, परभणी येथून जिल्हाधिकारी कार्यालय, परभणीकडे प्रयाण व आगमन. सायं. 6.30 ते 8.30 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक व भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘जल्लोष स्वातंत्र्याचा’ कार्यक्रमास उपस्थित राहतील. रात्री 8.30 वाजता श्री.आनंद भरोसे यांचे निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व स्वागत समांरभास उपस्थिती. रात्री 9.30 वाजता नगरसेवक श्री. मधुकर गव्हाणे यांच्या निवासस्थानी जातील. रात्री 11.00 वाजता सावली शासकीय विश्रामगृह, परभणीकडे प्रयाण, आगमन व मुक्काम करतील.

सोमवार, दि. 15 ऑगस्ट, 2022 रोजी सकाळी 8.55 वाजता सावली शासकीय विश्रामगृह, परभणी येथून जिल्हाधिकारी कार्यालय, परभणीकडे प्रयाण करतील. सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 75 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण करतील. सकाळी 9.45 वाजता पोलीस मुख्यालय परभणी येथील बहुउद्देशीय सभागृहाचे उदघाटन करतील. सकाळी 10.15 वाजता श्री.प्रमोद वाकोडकर यांच्या निवासस्थानी जातील. सकाळी 11.00 वाजता श्री. विजय वरपुडकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. आणि सकाळी 11.20 वाजता परभणी येथून औरंगाबादकडे प्रयाण करतील.

 

हेही वाचा : … आता तरी पूल बांधा हो.., नरसापूर ग्रामस्थांचे करपरा नदीपात्रात आंदोलन 

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!