राज्य टेनिसव्हॉलीबॉल : परभणी, बीड, मुंबईला सुवर्ण
विजेत्यांचा गौरव, तामिळनाडुत होणार राष्ट्रीय स्पर्धा
गणेश माळवे, बुलडाणा
चिखली (जि.बुलडाणा) : टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन व टेनिसव्हॉलीबॉल स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २४ वी राज्य टेनिसव्हॉलीबॉल स्पर्धा चिखली उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत परभणी जिल्हा सबज्युनिअर गटात मुले, मुली, मिश्र दुहेरी व ज्युनिअर मुलांच्या गटात, बीड जिल्हा ज्युनिअर मुली, तर मुंबई शहर ने मिश्र दुहेरीत सुवर्ण पदक प्राप्त केले. २५ सप्टेंबर रोजी समारोप झाला झाला. या वेळी विजेत्यांना गौरविण्यात आले. अंतिम फेरीत ज्युनिअर मुलीच्या गटात बीड विरुद्ध परभणी चुरशीच्या लढतीत ३-२ सेटने पराभव करत सुवर्ण- बीड, परभणी-रौप्य,-यवतमाळने कांस्यपदक मिळविले. अंतिम फेरीत ज्युनिअर मुलीच्या गटात परभणी विरुद्ध बीड चुरशीच्या लढतीत ३-२ सेटने पराभव करत परभणी-सुवर्ण, बीड -रौप्य, यवतमाळ- कांस्यपदक. अंतिम फेरीत ज्युनिअर मुलीच्या गटात बीड विरुद्ध परभणी चुरशीच्या लढतीत ३-२ सेटने पराभव करत – सुवर्ण-बीड, परभणी -रौप्य पदक मिळविले. अंतिम फेरीत सबज्युनिअर मुलीच्या गटात परभणी विरुद्ध बीड चुरशीच्या लढतीत २-१ सेट पराभव करत – सुवर्ण-परभणी, बीड-रौप्य, यवतमाळ कांस्यपदक. अंतिम फेरीत सबज्युनिअर मुलाच्या गटात परभणी विरुद्ध बीड चुरशीच्या लढतीत २-१ सेट पराभव करत – सुवर्ण- परभणी, बीड-रौप्य, यवतमाळ-कांस्यपदक , सबज्युनिअर मुलीच्या गटात परभणी विरुद्ध बीड चुरशीच्या लढतीत ३-२ सेट पराभव करत – सुवर्ण- परभणी बीड-रौप्य, -यवतमाळ कांस्यपदक मिळविले.
अध्यक्षस्थानी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शंतनू बोंद्रे, प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे अंकुश पाटील, आंतरराष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशनचे सरचिटणीस डॉ. व्यंकटेश वांगवाड, महाराष्ट्र राज्य सचिव गणेश माळवे, सहसचिव किशोर चोधरी, राज्य कोषाध्यक्ष दिनेश सिंगाराम, विभागीय सचिव जयदिप सोनखासकर, राज्य सदस्य संजय ठाकरे, तांत्रिक समिती चेअरमन प्रफुल्लकुमार बन्सोड आदींची उपस्थिती होती. या स्पर्धेतून तामिळनाडू येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघाची निवड समिती सदस्य अशोक शिंदे (मुंबई), रामेश्वर कोरडे (औरंगाबाद), संतोष खेंडे (सोलापूर), प्रमोद महाजन (औरंगाबाद) प्राची कडणे (आंतरराष्ट्रीय खेळाडू) यांची उपस्थिती होते. पंच म्हणून सतीश नावाडे, गणेश पाटील, राजेंद्र माघाडे, राहुल पेटकर, संतोष शिंदे, गणेश कलंगुळ, बंडू जमदाडे, अभिषेक सोनवणे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन प्रा.रवींद्र महाडिक, तर आयोजन समितीचे सचिव देवानंद नेमाणे यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी माधव मंडळकर( कोषाध्यक्ष) , अमोल उरसाल (उपाध्यक्ष ), दिपक महाले, संदिप नेमाने, पांडुरंग कोईवडे, ज्ञानेश्वर जाधव, संदिप बिथरले, सुनील ठेंगा आदींसह क्रीडा शिक्षक, संघटक आदींनी परीश्रम घेतले.