गुणवंतांना बळ : प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार 

गुणवंतांना बळ : प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार 

सेलूतील श्रीराम प्रतिष्ठानचा उपक्रम, मान्यवरांची उपस्थिती 

सेलू जि.परभणी : श्रीराम प्रतिष्ठानच्या एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूलमध्ये विविध परीक्षेतील गुणवंतांचा व त्यांच्या पालकांचा संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांच्या हस्ते मंगळवारी, २७ सप्टेंबर रोजी सत्कार करण्यात आला. अभियांत्रिकी उच्च शिक्षणासाठी गांधीनगर आयआयटीमध्ये निवड झालेल्या प्रेरणा भरत सवणे, आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाड परीक्षेत देशपातळीवर प्रथम क्रमांक पटकावणारा शौर्य दत्तात्रय काकडे, शिवोहम शिंदे, खुशी मानधणे, अथर्व नंद, श्रुती हाडुळे या विद्यार्थ्यांचा व पालकांचा या वेळी सत्कार करण्यात आला. डॉ.आदित्य रोडगे, प्राचार्य कार्तिक रत्नाला, डॉ.दत्तात्रय काकडे, डॉ. दत्तात्रय नंद, भरत सवणे, अरुण जाधव, डॉ.स्वप्निल मंत्री, माधव हाडोळे, बाबासाहेब काष्टे, डॉ. मानधणे, डॉ शिंदे, खजिने, डॉ. आशीष मेहता आदींची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती बरोबरच कौशल्य विकास, खेळ, व्यायामाकडे लक्ष द्यावे. व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावा. यशासाठी जिद्द बाळगावी. आवडीच्या क्षेत्रात शिक्षण, करिअर घडवावे, असे डॉ.रोडगे मार्गदर्शन करतांना म्हणाले.सूत्रसंचालन प्रमोद जाधव, तर आभार कल्पना भाबट यांनी मानले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!