दसरा महोत्सव : ५१ फुटी रावण पुतळ्याचे दहन; आतिषबाजी, गीत संगीताची धम्माल

दसरा महोत्सव : ५१ फुटी रावण पुतळ्याचे दहन; आतिषबाजी, गीत संगीताची धम्माल

गंगाखेड : साई सेवा प्रतिष्ठानचा उपक्रम : खासदार संजय जाधव, आमदार वरपुडकर, डॉ.गुट्टे यांच्यासह विविध पक्षनेत्यांची उपस्थिती

गंगाखेड : दसरा रथोत्सवास जोडून गेल्या बावीस वर्षांपासून साजरा होत असलेला आतीषबाजीसह अपप्रवृत्ती पुतळा दहन सोहळा बुधवारी, ५ ऑक्टोबर रोजी गोदातटावर रंगणार आहे. माजी मंत्री तथा कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर, खासदार संजय जाधव यांच्यासह विविध पक्षीय नेतेगणांची या कार्यक्रमास ऊपस्थिती असणार आहे. या सोहळ्यास जास्तीत जास्त नागरिकांनी हजर रहावे, असे आवाहन साईसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संयोजक तथा कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, सहसंयोजक, शहराध्यक्ष शेख युनूस, सचिव नागेश पैठणकर आदींनी केले आहे.

गंगाखेडचा दसरा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. दसऱ्याला निघणाऱ्या रथयात्रेत हजारो भाविकांची उपस्थिती असते. रथयात्रेनंतर आतीषबाजीसह अपप्रवृत्तीच्या ५१ फुटी पुतळा दहनाची श्री साईसेवा प्रतिष्ठानने २००१ पासून सुरू केलेली परंपरा आता भाविकांच्या विशेष आकर्षणाचे केंद्र बनलेली आहे. या सोहळ्यास हजारो भावीक, अबालवृद्ध गर्दी करतात. यावर्षी हा सोहळा विशेष उत्साहात साजरा केला जात आहे. आमदार सुरेश वरपुडकर यांच्या हस्ते पुतळा दहन केले जाणार असून, खासदार संजय जाधव यांच्या हस्ते कार्यक्रमाचे ऊद्घाटन आहे. गंगाखेडचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे, माजी आऊ डॉ. मधुसूदन केंद्रे, माजी सभापती बाळकाका चौधरी, भाजपा नेते संतोष मुरकुटे, डॉ.सिद्धार्थ भालेराव, माजी नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया, रामप्रभू मुंडे, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, पोलीस उपअधिक्षक श्रेणीक लोढा, तहसीलदार गोविंद येरमे, पोलीस निरीक्षक सुनिल माने, मुख्याधिकारी वसुधा फड, गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत मुंडे, जेष्ठ नेते बाबुराव गळाकाटू, कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष नदीम ईनामदार, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम, हरीभाऊ शेळके, ॲड संतोष मुंडे, बालाजी मुंडे, गंगाप्रसाद काकडे, डॉ. संजय लोलगे, कृष्णा भोसले, सखाराम बोबडे, राजकुमार सावंत, नितीन चौधरी, प्रमोद मस्के, अभय कुंडगीर, प्रणित खजे, चंद्रशेखर साळवे, प्रा. शुभांगी शिसोदीया, डॉ. के.पी. गारोळे, प्रा. आसाराम लोमटे, बालासाहेब पारवे, जगदिश देशमाने, प्रा. मंजू दर्डा, गोपी मुंडे आदिंची याप्रसंगी प्रमुख ऊपस्थिती असणार आहे.

नुकतेच सेवानिवृत्त झालेले गंगाखेड येथील जेष्ठ इतिहासकार प्राचार्य, डॉ.अनिल सिंगारे, राष्ट्रीय गौरव पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षिका ईंदुमती आवंके-कदम, नीट गुणवत्ताधारक विद्यार्थीनी तमसील रईस कादरी यांचा याप्रसंगी विशेष गौरव केला जाणार आहे. तसेच प्रिभूषण कला अकादमी व स्टार डान्स स्टुडिओचे कलाकार याप्रसंगी सांस्कृतीक कार्यक्रम सादर करणार आहेत. ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता गोदातटावर संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने हजर राहण्याचे आवाहन गोविंद यादव, शेख युनूस, नागेश पैठणकर, रमेश औसेकर, नंदकुमार भरड, कल्याण तुपकर, गुंडेराव देशपांडे, गजानन महाजन, पंकज भंडारी, सुशांत चौधरी, किरण जोशी, मनोज नाव्हेकर, संतोष तापडिया, मकरंद चिनके, बालासाहेब यादव, राजेंद्र पाठक, मनमोहन झंवर, अतुल गंजेवार, बंडू वडवळकर, कारभारी निरस, हरीभाऊ सावरे, बाळासाहेब राखे, कृष्णा पदमवार, गोविंद रोडे, डॉ फेरोज शेख, अतुल तुपकर, शाम कुलकर्णी, विष्णू मुरकुटे, संजय अनावडे, सुहास देशमाने, मारोती गोरे, व्यंकटेश यादव आदिंसह प्रतिष्ठान पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!