टेनिसव्हॉलीबॉल : खेळाने महाराष्ट्र जागतिक पातळीवर : विनोद बोराडे

टेनिसव्हॉलीबॉल : खेळाने महाराष्ट्र जागतिक पातळीवर : विनोद बोराडे

सेलूत राष्ट्रीय टेनिसव्हॉलीबॉल स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबीर उत्साहात

टेनिसव्हॉलीबॉल : खेळाने महाराष्ट्र जागतिक पातळीवर : विनोद बोराडे

सेलू ( जि.परभणी) : मारप्पा (तामीळनाडू)येथे ७ ते ९ आक्टोबर या कालावधीत संपन्न होणार्‍या २४ व्या राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.सत्यनारायणजी लोया यांच्या हस्ते सोमवारी, तीन ऑक्टोबर रोजी झाले. या वेळी बोलताना माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे म्हणाले, ” अल्पावधीतच टेनिस व्हॉलीबॉल या खेळामुळे महाराष्ट्राचे नाव जागतिक पातळीवर गेले आहे.”
प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव माजी प्राचार्य डॉ.व्ही.के.कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, माजी नगराध्यक्ष विनोदराव बोराडे, माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे मुख्याध्यापक नारायण सोळंके यांची उपस्थिती होती. टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र, परभणी जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन व नूतन विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले. महाराष्ट्र राज्याच्या टेनिस व्हॉलीबॉल संघातील मुंबई, सोलापूर, बीड, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, हिंगोली, परभणी जिल्ह्यातील २८ खेळाडूंचा यात समावेश आहे.
बोराडे म्हणाले, ” सुरुवातीला या खेळाबद्दल अधिक माहिती नसल्यामुळे, हा खेळ अधिक लोकांना परिचयाचा नव्हता. परंतु; अल्पावधीतच या खेळाने अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविले. त्यामुळे या खेळाने महाराष्ट्राचे नाव जागतिक पातळीवर पोहोचवले.” प्रास्ताविक राज्य सचिव गणेश माळवे, सूत्रसंचालन डॉ.काशीनाथ पल्लेवाड, तर जिल्हा सचिव सतीश नावाडे यांनी आभार मानले. उपमुख्याध्यापक संतोष पाटील, के.के.देशपांडे, डी.डी.सोन्नेकर, प्रा. नागेश कान्हेकर, प्रा.के.के.कदम, गिरीष लोडाया यांची उपस्थिती होती.

खेळातून भविष्य घडेल : प्राचार्य डॉ. कोठेकर

या वेळी डॉ. विनायकराव कोठेकर म्हणाले, “टेनिस व्हॉलीबॉल खेळाची निर्मिती अलिकडील काळात झालेली असली, तरी या खेळाने अल्पावधीतच राष्ट्रीय खेळांमध्ये स्थान मिळविले. पुढील काळात ऑलिम्पिकमध्ये देखील स्थान मिळवेल. या खेळातून खेळाडूंचे भविष्य घडेल. जगभरात हा खेळ वाढविण्यासाठी खेळाचे जनक डॉ.व्यंकटेश वांगवाड यांचे मोठे योगदान आहे.

टेनिसव्हॉलीबॉल : खेळाने महाराष्ट्र जागतिक पातळीवर : विनोद बोराडे

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!