रुग्णसेवा : दमा रुग्णांसाठी कोजागिरी पौर्णिमेला मोफत औषधी
सेलूतील दादुपंथी मठ गोशाळेचा उपक्रम
सेलू (जि.परभणी) : येथील श्री संत गोविंद बाबा दादुपंथी मठ गोशाळेच्यावतीने कोजागिरी पोर्णिमेनिमित्त रविवारी दिनांक ९ आक्टोबर २०२२ रोजी रात्री १२ वाजता अस्थमा/दमा रूग्णांना मोफत औषधी वाटप करण्यात येणार आहे. दरम्यान, औषधी घेणाऱ्यांनी उपाशी पोटी यावे, असे कळविण्यात आले आहे.
ही औषधी गौशाळा व बैद्यनाथ कंपनीच्या वतीने मोफत उपलब्ध करून देण्यात आली असून सोबत लागणारे गायीचे दुध, मुळ्याच्या भाजीपाला, मातीचेपात्र इत्यादी साहित्य गोशाळेकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रात्री ९ वाजता भजन संध्याला सुरुवात होईल व नंतर रात्री बारा वाजता औषधी वाटप करण्यात येणार आहेत.ज्या रूग्णांना या औषधीचा लाभ घ्यावयाचा आहे. त्यांनी सूर्यकांत जाधव 8329933472, गणेश भागडे 8830244005, बबलू दायमा 9422559370, श्रीनिवास काबरा 9028357975, विजय पांडे 9405390271, गोविंद शेलार 9271413199, शिवनारायण मालाणी 9422886889 यांच्याकडे संपर्क करावा, असे आवाहन सुरेंद्र तोष्णीवाल, जगन्नाथ पवार, राजेंद्र करवा, कृष्णा काटे, राधेश्याम राठी, अशोक शेलार, आनंद सोनी यांनी केले आहे.
सोबत लागणारे गायीचे दुध, मुळ्याच्या भाजीपाला, मातीचेपात्र इत्यादी साहित्य गोशाळेकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रात्री ९ वाजता भजन संध्याला सुरुवात होईल व नंतर रात्री बारा वाजता औषधी वाटप करण्यात येणार आहे.