रावण पुतळा दहन : तूफान प्रतिसाद, रंगतदार आतषबाजी
साई सेवा प्रतिष्ठानचा शानदार उपक्रम : गंगाखेडच्या गोदाकाठावर रंगला अपप्रवृत्ती दहन सोहळा
गंगाखेड : भाविकभक्त, नागरिक प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद उत्साह, निसर्गाने दिलेली साथ या सर्व पार्श्वभूमीवर साईसेवा प्रतिष्ठानचा गोदाकाठावरील दसरा महोत्सव संपन्न झाला. विविध पक्षीय नेते, प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती, गुणवंत गौरव, स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक सादरीकरण, ड्रोन कॅमेरा चित्रीकरणासह भव्य पडद्यावरील प्रक्षेपण आणि नेत्रदीपक आतषबाजीसह अपप्रवृत्तींचा ५१ फुटी पुतळा दहन हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.
गंगाखेडच्या सुप्रसिद्ध दसऱ्याच्या पार्शभूमीवर साई सेवा प्रतिष्ठाणने गेल्या २१ वर्षांपासून गोदातटावर अपप्रवृत्ती पुतळा दहन परंपरा जपली आहे. यावर्षी विशेष ऊत्साहात हा सोहळा संपन्न झाला. गंगाखेडचे माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार गोविंद येरमे, पोलीस निरीक्षक सुनील माने, मनसे किसान प्रदेश उपाध्यक्ष बालाजी मुंडे, ॲड.मिथीलेश केंद्रे, मेजर विश्वनाथ सातपुते, आप जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे, नाभिक सेनेचे बालासाहेब पारवे, गोपी मुंडे, नारायण घनवटे आदींची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी सेवानिवृत्त प्राचार्य इतिहासकार डॉ.अनिल सिंगारे, नीट परीक्षेतील गुणवंत तमसील रईस कादरी, आदर्श शिक्षिका इंदुमती कदम-आवंके नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक शिवाजी हजारे आणि शेख कन्स्ट्रक्शनचे मेहराज शेख यांचा विशेष स्वच्छता अभियानाबद्दल गौरव करण्यात आला. शहरातील प्रिभूषण अकादमीचे भूषण गाडे, स्टार डान्स स्टुडीओचे राधे आवाड आणि संचाने एकाहून एक सरस नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली. प्रास्ताविक मनोगत साईसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा संयोजक, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी केले. सहसंयोजक कॉंग्रेस शहराध्यक्ष शेख युनूस, सचिव नागेश पैठणकर, रमेश औसेकर, मनोज नाव्हेकर, बालासाहेब यादव, गुंडेराव देशपांडे, नंदकुमार भरड, किरण जोशी, अतुल गंजेवार, गोविॅद रोडे, किरण जोशी, राजेंद्र पाठक, वर्षा यादव, स्वाती पैठणकर, पूजा यादव आदींनी स्वागत केले. नेत्रदिपक आतषबाजी नंतर अपप्रवृत्तींच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी व्यंकट रमना गोविंदा आणि जय श्रीरामची घोषणाबाजी करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्ता जोशी यांनी केले. तर आभार शेख युनूस यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विठ्ठल भुसांडे ( हिंगोली ), महेश परडे, सुहास देशमाने, सिद्धार्थ भालेराव, बाळासाहेब सोनटक्के, व्यंकटेश यादव, मारोती गोरे, शिवा डमरे, अशोक राष्ट्रकुट, पप्पू राऊत, किरण यादव, शिवा शिंदे, लाला अनावडे, प्रकाश शिंगाडे, दत्तराव भिसे, नागनाथ चोरघडे, परसराम गिराम, भगत सुरवसे आदींसह प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमस्थळी हजारोंचा जनसमुदाय जमला होता. काही काळ वाहतूक ठप्प झाली. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
या वेळी सेवानिवृत्त प्राचार्य इतिहासकार डॉ.अनिल सिंगारे, नीट परीक्षेतील गुणवंत तमसील रईस कादरी, आदर्श शिक्षिका इंदुमती कदम-आवंके , नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक शिवाजी हजारे आणि शेख कन्स्ट्रक्शनचे मेहराज शेख यांचा विशेष स्वच्छता अभियानाबद्दल गौरव करण्यात आला.
हेही वाचा : रुग्णसेवा : दमा रुग्णांसाठी कोजागिरी पौर्णिमेला मोफत औषधी
हेही वाचा : दसरा महोत्सव : गंगाखेड: ५१ फुटी रावण पुतळ्याचे दहन; आतिषबाजी, गीत संगीताची धम्माल