चोरट्यांचा डल्ला : सेलूतील दोन दुकाने फोडली

चोरट्यांचा डल्ला : सेलूतील दोन दुकाने फोडली

रोकड, ऐवज पळविला; गुन्हा दाखल

सेलू (जि.परभणी) : येथील श्रीमती एस.एस.भुतडा ॲन्ड पार्टनर्स वाईन शॉप फोडून अज्ञात चोरट्यांनी रोकड व दारूच्या बाटल्या आणि जवळेकर चौकातील पंतजली स्वदेशी केंद्रातील चिल्लर व सामान असा एकूण ६० हजार ६७५ रुपयांचा मुद्देमाल पळविला आहे. 

फिर्यादीत म्हटले आहे, की दि. 04/10/22 चे रात्रीचे 9.00 ते दि.05/10/22 चे दुपारी 12.30 दरम्यान, श्रीमती एस.एस.भुतडा अँन्ड पार्टनर्स या वाईन शॉपमधील नगदी व वाईनचा माल असा एकूण 45175 रूपयाचा व साक्षीदार यांच्या पंतजली स्वदेशी केंद्र दुकानातील नोटा, चिल्लर व पतंजलीचे सामान असे एकूण 15,500 रूपये असा एकूण 60,675 रूपयाचा माल कोणीतरी अज्ञात चोरट्याने दुकानाचे पत्रे बाजूला करून अनाधिकृतरीत्या प्रवेश करून चोरून नेला आहे. या प्रकरणी व्यंकटेश श्यामसुंदर काबरा ( रा.पारख कॉलनी, सेलू) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध सेलू पोलिस ठाण्यात बुधवारी सायंकाळी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलिस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड, अंधारे, शेख, नाईक, चौरे यांनी भेट दिली. एएसआय चौरे तपास करीत आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!