गर्दी उसळली :  सेलूतील रावण पुतळा दहन ; आतषबाजीत आसमंत उजळला

गर्दी उसळली :  सेलूतील रावण पुतळा दहन ; रंगबिरंगी आतषबाजीत आसमंत उजळला

विनोद बोराडे मित्र मंडळाचा उपक्रम : विविध पक्ष, संघटनांच्या पदाधिकारी, मान्यवरांनी लावली हजेरी

गर्दी उसळली :  सेलूतील रावण पुतळा दहन

सेलू जि.परभणी : दसऱ्यानिमित्त नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित 51 फूट उंचीच्या रावण पुतळा दहन कार्यक्रमाला बुधवारी, पीच ऑक्टोबर रोजी सायंकाळी प्रेक्षकांची मोठी गर्दी उसळली होती. माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे मित्र मंडळ आणि उदयोन्मुख तरुण नेते साईराज बोराडे यांच्या मित्र मंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यानिमित्ताने रगंबिरंगी फटाक्यांची आतषबाजी, गीत संगीताच्या कार्यक्रमाचा रसिकांनी मनमुराद आनंद लुटला.
बुधवारी सायंकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्याने सीमोल्लंघनाला नागरिक उशिराने घराबाहेर पडले. त्यामुळे रावण दहनाचा कार्यक्रमही काही काळ लांबला. मात्र; रावण दहन कार्यक्रमाच्या वेळी नूतन महाविद्यालयाकडे जाणारे रस्ते गर्दीने फुलून गेले. वाहतूकही ठप्प झाली. मैदानही काही मिनिटांत फुल्ल झाले. शेकडो नागरिकांनी मुख्य रस्त्यांच्या कडेला उभे राहून रावण दहन कार्यक्रमाचा आनंद घेतला. या वेळी श्रीराम, लक्ष्मण, हनुमानजीच्या वेशभूषेतील कलाकारांनी लक्ष वेधून घेतले. प्रारंभी श्रीराम प्रतिमेचे पूजन झाले. तहसीलदार दिनेश झांपले, पोलिस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड, सेलू तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मुकेशराव बोराडे, प्रसिद्ध उद्योजक सेलूभूषण जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, साईराज बोराडे,  कन्हैयालाल बालचंदानी, सतीश दिग्रसकर, माजी नगराध्यक्ष मारोती चव्हाण, माजी नगरसेवक मनीष कदम, शेख कासीम गौतम धापसे, संजय राजूरकर, मिलिंद सावंत, पत्रकार डॉ.विलास मोरे, महंमद इलियास, रेवणअप्पा साळेगावकर,  मुख्याध्यापक रामप्रसाद गोरे, माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, गंगाधर कान्हेकर, सुदाम गुटाळ, सचिन कोरडे आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले.

गर्दी उसळली

गर्दी उसळली :  सेलूतील रावण पुतळा दहन

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!