श्री वैष्णोदेवी मंदिर : परिसर देखावा पाहण्यासाठी सेलूकरांची झु़ंबड
सारंगीगल्लीतील संतोष गरड परिवाराने जपली बारा वर्षांची परंपरा
सेलू जि.परभणी : येथील सारंगी गल्लीतील संतोष अशोक गरड परिवाराने नवरात्रोत्सवानिमित्त यंदा श्री वैष्णोदेवी मंदिर परिसराचा सुंदर देखावा उभारला आहे. हा देखावा पाहण्यासाठी रविवारपासून (दोन ऑक्टोबर) नागरिक, महिला प्रेक्षकांची मोठी झुंबड उडाली होती. राहत्या घरी बारा बाय दहाच्या खोलीमध्ये देखावा उभारण्यात आला आला आहे. या साठी गरड कुटुंबियांना दहा-बारा दिवसाचा वेळ लागला. उंचची उंच पर्वत शिखरे , गर्द झाडी, रोप वे विमानतळ, रेल्वेस्टेशन, हेलिपॅड, उकळत्या पाण्याचे कुंड, धबधबे व माता वैष्णोदेवीची विराजामान मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेते. विशेष म्हणजे घरातील टाकावू रिकाम्या पाणी बॉटल, प्लस्टिक, कागदी पुठ्ठ, डब्बे, बारदानादगड, काळी माती तसेच गिट्टीचा कल्पकतेने वापर करण्यात आला आहे. आई, वडील, भाऊ आदींनी देखावा तयार करण्यासाठी सहकार्य केले, असे नुकतेचा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केलल्या संतोष गरड यांनी सांगितले. या आधी भारतीय सैन्य दल, पौराणिक प्रसंगावरील देखाव्यांनाही चांगला प्रतिसाह मिळाला होता, असे गरड म्हणाले.