कस्तुरबा गांधी : बालिका विद्यालयात दिवाळीनिमित्त कार्यक्रम 

कस्तुरबा गांधी : बालिका विद्यालयात दिवाळीनिमित्त कार्यक्रम 

उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांची उपस्थिती 

सेलू जि.परभणी : कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अनाथ, एकल पालक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींसाठी दिवाळीनिमित्त गुरूवारी (ता.२० ) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी अरूणा संगेवार होत्या. तहसीलदार दिनेश झांपले, गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत, शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या संकल्पनेतून कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थ्यीनींच्या मदतीसाठी गटशिक्षणाधिकारी राऊत यांनी तालुक्यातील सर्व शिक्षकांना मदतीचे आवाहन केले होते. त्या लोकसहभागातून ड्रेस व दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन पांडुरंग पाटणकर यांनी केले. मुख्याध्यापिका सुनिता वेडे, प्रेरणा पवार, मिना मावरे यांची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!