सन्मानसोहळा : आर्थिक शिस्तीसाठी चौफेर वाचन गरजेचे  : श्रीतुळजाभवानी बॅंकेचे शहाजी शेजुळ यांचे प्रतिपादन

सन्मानसोहळा : आर्थिक शिस्तीसाठी चौफेर वाचन गरजेचे  : श्रीतुळजाभवानी बॅंकेचे शहाजी शेजुळ यांचे प्रतिपादन

स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाचा उपक्रम : विविध पुरस्कारप्राप्त नागरिक, स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

सन्मानसोहळा : आर्थिक शिस्तीसाठी चौफेर वाचन गरजेचे  : श्रीतुळजाभवानी बॅंकेचे शहाजी शेजुळ यांचे प्रतिपादन

सेलू,जि.परभणी : डिजिटल तंत्रज्ञान आणि माध्यमांचा वाढता वापर यामुळे वाचन संस्कृती प्रभावित झाली आहे.  ऑनलाईन, डिजिटल पेमेंट व्यवहारही वाढले आहेत. अशा परिस्थितीत सर्वच स्तरावर संभाव्य धोके टाळण्यासाठी आर्थिक साक्षर असणे आणि अर्थ शिस्त, अर्थभान जपणे आवश्यक आहे. चौफेर वाचनातून हे साध्य होते. याची जागृती गरजेची आहे, असे प्रतिपादन माजलगाव येथील श्रीतुळजाभवानी अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शहाजी शेजुळ यांनी शुक्रवारी (१९ ऑक्टोबर) केले.

स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या वतीने डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती निमित्त व वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्यांचा; तसेच पुरस्कारप्राप्त नागरिक, संस्थांचा सन्मान शुक्रवारी (२१ ऑक्टोबर) करण्यात आला. अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे जेष्ठ सदस्य ज्ञानोबा बोराडे होते. माजलगाव येथील श्रीतुळजाभवानी अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी‌ शहाजी शेजुळ, सेलू येथील साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, उद्योजक रामप्रसाद घोडके, पत्रकार नारायण पाटील, गंगाधर कान्हेकर, प्रा.नागेश कान्हेकर, प्रवीण माणकेश्वर, ग्रंथालयाचे सचिव प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, सहसचिव चंद्रशेखर मुळावेकर आदींची उपस्थिती होती. प्रारंभी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी हेमंतराव आडळकर (बँको पुरस्कार), रामप्रसाद घोडके ( परमवीर अब्दुल हमीद पुरस्कार), पत्रकार नारायण पाटील ( दैनिक सामना उत्कृष्ट तालुका वार्ताहर पुरस्कार) प्रवीण माणकेश्वर (बांबू सेवक पुरस्कार), प्रा.नागेश  कान्हेकर  व गंगाधर कान्हेकर ( राष्ट्रीय सुवर्ण रत्न गौरव पुरस्कार) यांचा ग्रंथालयाच्यावतीने सन्मान करण्यात आला. स्वच्छता पुरस्कारप्राप्त सेलू नगर परिषदेचा सन्मान अशोक कासार यांनी स्वीकारला.

प्रारंभी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी आडळकर यांनी साईबाबा बँकेचा, तर शेजुळ यांनी श्री तुळजाभवानी बँकेचा प्रेरणादायी प्रवास सांगितला. वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित सामान्यज्ञान, वक्तृत्व, काव्यवाचन, अभिवाचन स्पर्धा संयोजक, परीक्षक आणि विजेत्यांना प्रमाणपत्र व पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. पूज्य सानेगुरुजी यांनी स्थापन केलेल्या आंतरभारती ट्रस्ट द्वारा, राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त आयोजित खुल्या राष्ट्रीय निबंध स्पर्धेतील परभणी जिल्हास्तरीय विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. प्रथम पारितोषिक प्राप्त प्रणिता केरे (मानवत), द्वितीय कीर्ती राऊत (सेलू) व गीता कत्ते (परभणी), तृतीय आयेशा खान पठाण (परभणी), युवराज माने, सेलू यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. परीक्षक डॉ.गंगाधर गळगे, डॉ.भाग्यश्री धामणगावकर, संभाजी रोडगे यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. जिल्हा संयोजक बाबासाहेब हेलसकर, कथामालेच्या कल्पना हेलसकर यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक सचिव प्राचार्य डॉ शरद कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.भाग्यश्री धामणगावकर यांनी केले. प्रा.राजाराम झोडगे यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. प्रा.अनंत मोगल यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहसचिव चंद्रशेखर मुळावेकर,  महादेव आगजाळ, पंडितराव जगाडे, विलास शिंदे, शाम पवार, अनिरुद्ध टाके, अमोल बिडवे, बाबासाहेब हेलसकर, अनुराधा कानडे, अनिल रत्नपारखी, शरद ठाकर, सुरेश हिवाळे, अश्विनी विटेकर, भगवान पावडे,  रवी मुळावेकर, प्रा.राजाराम झोडगे, आदित्य थोरे आदींनी परिश्रम घेतले. माजी जिल्हा परिषद सभापती अशोक काकडे, अशोक कासार, डी.के.माकोडे गुरुजी, प्रा.प्रभाकर रावते, ललिता गिल्डा, एम.आर.पटेल, डी.व्ही.मुळे, रामराव लाडाणे, गिरीश लोडाया, मुख्याध्यापक नारायण सोळंके, सर्जेराव लहाने, रवी कुलकर्णी, रवी मुळावेकर आदींसह वाचक, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

पूज्य सानेगुरुजी यांनी स्थापन केलेल्या आंतरभारती ट्रस्ट द्वारा, राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त आयोजित खुल्या राष्ट्रीय निबंध स्पर्धेतील परभणी जिल्हास्तरीय विजेत्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. प्रथम पारितोषिक प्राप्त प्रणिता केरे (मानवत), द्वितीय कीर्ती राऊत (सेलू) व गीता कत्ते (परभणी), तृतीय आयेशा खान पठाण (परभणी), युवराज माने, सेलू यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

 

सन्मानसोहळा : आर्थिक शिस्तीसाठी चौफेर वाचन गरजेचे  : श्रीतुळजाभवानी बॅंकेचे शहाजी शेजुळ यांचे प्रतिपादन

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!