एसपी आर.रागसुधा : मोबाईल चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; दोघे गजाआड, विविध गुन्ह्याची दिली कबुली

एसपी आर.रागसुधा : मोबाईल चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; दोघे गजाआड, विविध गुन्ह्याची दिली कबुली

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे सापळा रचून आरोपी घेतले ताब्यात, परभणीतील मोबाईल शॉपी फोडून लाखोंचे किंमती मोबाईल चोरल्याची घटना 

एसपी रागसुधा : मोबाईल चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; दोघे गजाआड, विविध गुन्ह्याची दिली कबुली

परभणी : दोनवेळा रेकी करून शहरातील नारायण चाळ कॉर्नर भागातील मोबाईल शॉपी फोडणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे ही कारवाई केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक आर.रागसुधा यांनी शनिवारी, २९ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत दिली.

अप्पर पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक साईनाथ पुयड, मारोती चव्हाण यांच्यासह तपास पथकातील कर्मचारी आदींची उपस्थिती होती. दि.२२ ते दि.२३ ऑक्टोबरच्या रात्री परभणीतील नारायण चाळ येथील “वर्ल्ड गिफ्ट मोबाईल शॉपी” दुकान फोडून अज्ञात चोरटयांनी आयफोन, नोकीया, वन प्लस, ओपो, रियलमी, सॅमसंग, विवो, ॲपल एअर पॉडस, ॲपल ॲडॉप्टर, टेक्नो असे वेगवेगळ्या कंपनीचे मोबईल व ध्वनी उपकरणे, असे २०२ मोबाईल्स मिळून एकूण ४८ लाख ५१ हजार ७३२ रुपयाचा माल चोरुन नेला होता. या प्रकरणी राजेश ग्यानचंद चावला (रा.नानलपेठ परभणी) यांच्या फिर्यादीवरुन नवामोंढा पोलीस ठाण्यात ४५७, २८० भादंविप्रमाणे २३ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी अज्ञात असल्याने पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन परभणी शहरातील सिसिटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस अधिक्षक आर. रागसुधा, अपर पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, सहायक पोलीस अधिक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांची चार पथके तयार करुन सायबर शाखा व सिसिटीव्ही फुटेजच्या आधारे माग काढण्यासाठी मालेगाव (जि.नाशिक), जालना, माजलगाव, आष्टी (जि.बीड), परभणी जिल्ह्यातील पाथरी, पूर्णा अशा ठिकाणी पथके रवाना केली. २८ ऑक्टोबर रोजी मालेगाव (जि. नाशिक) येथे तपास कामी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखा, परभणीच्या पथकास गोपनीय माहिती मिळाल्यावरुन आरोपी अफसरखान उर्फ पप्पु हबीबखान (वय २९ ), शकील अहेमद अब्दुल मजीद (वय ३८ वर्षे दोघे रा.पवारवाडी) यांना मालेगाव येथे सापळा रचून ताब्यात घेतले. विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी या गुन्ह्यातील मास्टर माईंड टोळी प्रमुख आरोपी अकबरखान उर्फ चोरबा हबीबखान (वय ३९ रा.अक्सा कॉलनी मालेगाव) याने त्याचे साथीदार कैसरखान हबीबखान (वय २२ रा. पवारवाडी), सय्यद हुसेन उर्फ सोनू सय्यद अली (वय २५ वर्षे रा. शब्बीरनगर नांदेडी शाळेजवळ मालेगाव) यांच्यासह हा गुन्हा केल्याची कबूली दिली. गुन्हा करण्याच्या काही दिवसांपूर्वी मास्टर माईंड टोळी प्रमुख आरोपी अकबरखान उर्फ चोरबा हबीबखान याने दुकानाची रेकी करुन गुन्ह्यातील इतर साथीदारांना सहयोग हॉटेल धुळेरोड, मालेगाव येथे बोलावून, परभणी येथे चोरी करण्यासाठी जायचे आहे, असे सांगून त्याचा प्लान समजावून सांगितला. गुन्हा करण्यासाठी आरोपी सय्यद हुसेन उर्फ सोनू सय्यद अली याने इनोव्हा चारचाकी वाहन आणले. तेथून ते औरंगाबाद-जालना-देगावफाटा, सेलू-मानवतरोड मार्गे परभणी येथे अंदाजे सायंकाळी ६ वाजता दर्गा रोडच्या मोकळ्या जागेत मैदानात थांबले. तेथून गुन्ह्यातील मास्टर माइंड अकबरखान उर्फ चोरबा हबीबखान व त्याचे साथीदार यांनी परभणीत “वर्ल्ड गिफ्ट मोबाईल शॉपी”ची पुन्हा एकदा २२ ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता रेकी केली. त्यानंतर २३ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजता साथीदारासह इनोव्हामध्ये येऊन दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश करुन दुकानातील एकूण २०२ मोबाईल्स किंमत ४८ लाख ५१ हजार ७३२ रुपयाचा माल चोरुन नेला होता. दोन आरोपीतांच्या ताब्यातून तपासात त्यांचे हिश्श्यात आलेले मोबाईल व ध्वनी यंत्र असा एकुण ४ लाख १ हजार ७२० रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्यावरुन आरोपीतांकडे अधिक चौकशी करता त्यांनी महाराष्ट्रात व तर राज्यात विविध ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. परभणी जिल्ह्यात गंगाखेड, कोतवाली, नवामोंढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी चोरीत सहभाग असल्याची कबुली दिली आहे. लातूर येथे एल.जी. शोरुम फोडून मुद्देमाल चोरुन नेल्याची कबुली दिली आहे. हैद्राबाद येथे दारूचे दुकान फोडून चोरी केली आहे. तरी पो.स्टे. नवामोंढा येथे दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मुंढे हे करीत आहेत. पोलीस अधिक्षक आर.रागसुधा अपर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, सहायक पोलीस अधिक्षक अविनाश कुमार, स्थागुशा प्रभारी पोलीस निरीक्षक व्ही.डी.चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके गठीत करण्यात येऊन आरोपीचा कसून शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलिस उपनिरीक्षक साईनाथ पुयड, तुपसुंदरे, सय्यद मोबीन, दिलावर पठाण, राम पौळ, चालक संजय घुगे, पोलिस उपनिरीक्षक मारोती चव्हाण, विलास सातपुते, सिधेश्वर चाटे, नामदेव दुबे, मुरकुटे, नागनाथ तुकडे, हरिचंद्र बनवसे, गायकवाड, ढवळे, कांबळे, कुसमे, रवि जाधव, परसोडे, रफीयोद्दीन शेख, पिराजी निळे, सायबर पोलीसचे गुलाब बाचेवाड, रेड्डी, गणेश कौटकर, गौस, राजेश आगाशे, संतोष मोहळे, पवन आवचार, व्यंकटेश नरवाडे यांनी आरोपी अटक करण्यासाठी कामगिरी बजावली आहे. परभणी पोलीस दलातर्फे सर्व व्यापारी यांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी आपल्या दुकानासमोर प्रखर लाईट व सिसिटीव्ही कॅमेरे लावावेत व संशयित इसम आपल्या दुकानात आल्यास त्याबाबत पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी.

हेही वाचा : शेकडो दिव्यांनी उजळला हातनूरचा बारव परिसर 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!