श्रीनागनाथ मंदिर : शेकडो दिव्यांनी उजळला हातनूरचा बारव परिसर
तरुणांचा पुढाकार, गावकऱ्यांचा मोठा सहभाग
सेलू, जि.परभणी : दिवाळी पाडव्या निमित्त हातनूर येथील श्रीनागनाथ मंदिरच्या बारवावर ग्रामस्थांनी दीपोत्सव साजरा केला. या वेळी हजारो दिव्यांनी परिसर उजळून निघाला. सुमारे चार हजार दिवे प्रज्वलित करून मंदिर व बारव परिसर प्रकाशमय करण्यात आला. गावातील तरुणांनी यासाठी पुढाकार घेतला. महिला, पुरुषांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
हेही वाचा : मोबाईल चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, दोघे गजाआड