आयर्न मॅन : राम गोमारे यांचा सत्कार; सेलूत कार्यक्रम
पोहणे, धावणे, सायकलिंग स्पर्धा अवघ्या ११.५० मिनिटांत केल्या पूर्ण
सेलू जि.परभणी : कझाकिस्तान येथे पार पडलेल्या जागतिक आयर्न मॅन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या राम गोविंदराव गोमारे यांचा सेलू येथे हितचिंतकांनी गुरुवारी (२७ ऑक्टोबर) यथोचित सत्कार केला.
कझाकिस्तानमधील नूर सुलतान या आयर्न मॅन स्पर्धा झाल्या. त्यात राम गोमारे यांनी पोहणे, धावणे, सायकल स्पर्धा असे एकत्रित मिळून 17 तासांचे अंतर अवघ्या 11.50 मिनिटांत पूर्ण करून ‘आयर्न मॅन’ पुरस्कार मिळविला. राम गोमारे हे पुणे येथे सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. सेलू येथील रहिवासी व म्हाळसापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक ज्ञानोबा वंगवाड यांचे ते जावई आहेत. दिवाळीनिमित्त सेलूत आले असता, गोमारे यांचा वंगवाड परिवार व मित्रमंडळाकडून शाल, श्रीफळ, बुके व पुष्पहार घालून कौटुंबिक कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ज्ञानोबा वंगवाड, दत्ता चामले, महादेव कोलेवाड, धनंजय भागवत, जनार्दन येलमटे, राम गोमारे, प्रणिता गोमारे, डॉ.स्वप्निल खवटे, डॉ शैलेश येलगट्टे, श्रीनिवास येलगट्टे, गोपाळ येलगट्टे, नीलेश येलगट्टे, नामदेव येलगट्टे, प्रमोद आदींची उपस्थिती होती.
हे पण वाचा :