दामिनी पथक : अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद मनगटात ठेवा

दामिनी पथक : अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद मनगटात ठेवा

भाग्यश्री पुरी यांचे प्रतिपादन :  सेलूतील ज्ञानतीर्थ  विद्यालयात कार्यशाळा उत्साहात

सेलू, जि.परभणी, ता.23 : श्रीराम प्रतिष्ठान संचलित ज्ञानतीर्थ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी करिता दामिनी पथक एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन २३ नोव्हेंबर, बुधवार रोजी करण्यात आले होते. या वेळी बोलतांना सेलू पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक तथा दामिनी पथक प्रमुख भाग्यश्री पुरी म्हणाल्या, “अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद मुलींनी आपल्या मनगटात ठेवली पाहिजे.” या वेळी अस्मिता मोरे, मुख्याध्यापिका शालिनी शेळके आदींची उपस्थिती होती. 
शालेय विद्यार्थिनी जीवन जगतांना निर्भय होऊन सुरक्षित जीवन कसे जगावे या करिता एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी आद्य शिक्षिका क्रांति ज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेत शिक्षणाच्या माध्यमातून लढवय्या नेतृत्व विकसित करून समाजातील घातक प्रवृत्तीला संपुष्टात आणण्याचे आवाहन पुरी यांनी केले तसेच महिला व‌ विद्यार्थीनी आपल्यावर होणाऱ्या अत्याचारा विरुद्ध अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आपल्या मनगटात तयार करून स्वतःला स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. महिला अत्याचार, बालविवाह त्याचबरोबर Good Touch,Bad Touch मानसिक प्रवृत्तीला ओळखून तात्काळ त्यासंदर्भातली माहिती निर्भया व दामिनी पथकाला देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला ज्ञानतीर्थ विद्यालय व प्राॅस्पेरस पब्लिक स्कूलच्या विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन डिगांबर टाके यांनी केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!