पावनेदोन लाखांना गंडा : सेलूतील वकिलाला फसविले; गुन्हा दाखल

पावनेदोन लाखांना गंडा : सेलूतील वकिलाला फसविले; गुन्हा दाखल

पारिजात कॉलनी भागातील प्रकार : विश्वास ठेवून केलेला आर्थिक व्यवहार आला अंगलट

सेलू जि.परभणी : घराच्या छतावर फॅब्रिकेशनचे काम करून सिलिंग करण्यासाठी लागणाऱ्या कामाची अर्धी रक्कम दिली. मात्र, संबंधिताने आजपर्यंत कामही केले नाही व पैसे परत न देता, काम करत नाही, असे सांगून विश्वासघात केल्याप्रकरणी एका विरुद्ध सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सेलू शहरातील पारिजात कॉलनी भागातील लहेरचंद हिराचंद खोना यांनी बुधवारी, 23 नोव्हेंबर रोजी सेलू ठाण्यात फिर्याद दिली आहे. २७ एप्रिल ते २३ नोव्हेंबर या दरम्यान लहेरचंद खोना यांच्या पारिजात कॉलनीतील घरी छतावर फेब्रिकेशनचे काम करून पत्र्याचे छत टाकून सिलिंगचे काम, सिलिंग टाइल्स सोबत करून देण्यासाठी औरंगाबाद गारखेडा भागातील विश्वकर्मा फॅब्रिक सिस्टमचे सुभाष जगन्नाथ सोनवणे यांच्याशी व्यवहार केला. यामध्ये १ लाख ७५ हजारांची  रक्कम कामाच्या स्वरूपात आरटीजीएसद्वारे लहेरचंद खोना यांनी सुभाष सोनवणे यांच्या खात्यात पाठवली. परंतु त्यानंतर आजता गायात संबंधिताने हे काम केले नाही व कामाविषयी विचारणा केली असता, सदरील काम करत नाही व पैसेही परत देत नाही असे सांगितले. त्यावरून लहेरचंद खोना यांनी सेलू ठाण्यात यापूर्वी १३ जुलैला अर्ज दिला होता. त्यावरून बुधवारी संबंधीता विरुद्ध गुन्हा दाखल नोंद करण्यात आला आहे.घटनेचा तपास पोलीस कर्मचारी वासलवार करीत आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!