एनडीए : सेलूचा कॅडेट संगमेश मलवडे चमकला

एनडीए : सेलूचा कॅडेट संगमेश मलवडे चमकला

खडकवासला (पुणे) पार पडला दिमाखदार पासिंग आऊट परेड सोहळा, सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्णत्वाक़डे

सेलू,जि.परभणी : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) च्या 143 व्या तुकडीचा दिक्षांत समारंभ व पासींग आऊट परेड 30 नोव्हेंबर रोजी एनडीए, खडकवासला, पुणे येथे मोठ्या दिमाखात पार पडली. या परेडमध्ये सेलू जि. परभणी येथिल कॅडेट संगमेश कैलास मलवडे यांचा सहभाग महत्त्वपूर्ण राहिला. यावेळी भारत व मित्र राष्ट्र मिळून एकूण 309 कॅडेट पासींग आउट झाले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नौसेनाप्रमुख ॲडमिरल आर हरीकुमार हे उपस्थित होते.. अतिशय खडतर समजले जाणारे एनडीएचे तीन वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करून जेएनयू विद्यापीठाची कला शाखेची पदवी त्यांने मिळवली. यानिमित्ताने त्याचे सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्णत्वास जात आहे. पुढील एक वर्षाच्या प्रतिक्षणासाठी या कॅडेट्सना आयएमए डेहराडून येथे पाठविले जात आहे. संगमेशचे वडील कैलास मलवडे हे सेलू येथील नूतन विद्यालय संस्थेत शिक्षक आहेत. शालेय जीवनात सैन्यात अधिकारी होण्याचे त्यांचे ध्येय लवकरच पूर्ण होईल, अशी भावना संगमेशची आई शिवानी मलवडे यांनी दिली. त्यांचे शालेय शिक्षण प्रिन्स इंग्लिश स्कूल, सेलू येथे, तर उच्च माध्यमिक शिक्षण औरंगाबादच्या सैनिकीपूर्व प्रशिक्षण संस्था (एस.पी आय) मध्ये पूर्ण केले. ते १४१ व्या कोर्सचे विद्यार्थी आहेत. देशाची प्रामाणिक सेवा करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. सेलू‌ व ग्रामीण आगात एक वेगळा आदर्श निर्माण करून अनेक विद्यार्थ्यांना या क्षेत्राकडे आकर्षित केले. त्यांच्या या अभिमानास्पद यशामुळे त्यांचे सर्वत्र सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

यानिमित्ताने त्याचे सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्णत्वास जात आहे. पुढील एक वर्षाच्या प्रतिक्षणासाठी या कॅडेट्सना आयएमए डेहराडून येथे पाठविले जात आहे. संगमेशचे वडील कैलास मलवडे हे सेलू येथील नूतन विद्यालय संस्थेत शिक्षक आहेत. शालेय जीवनात सैन्यात अधिकारी होण्याचे त्यांचे ध्येय लवकरच पूर्ण होईल, अशी भावना संगमेशची आई शिवानी मलवडे यांनी दिली.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!