महामानवाला अभिवादन : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना सेलूत मानवंदना
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना शाळा, महाविद्यालयांसह विविध पक्ष, संघटना, नागरिकांकडून अभिवादन
सेलू जि.परभणी : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंगळवारी, ६ डिसेंबर रोजी सेलू शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. विविध पक्ष, संघटना, संस्था, शाळा, महाविद्यालयांत विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विविध ठिकाणी डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. विविध स्तरातील नागरिकांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.
सेलू तालुका काँग्रेस पक्षाच्यावतीने महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. तालुका काँग्रेसचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, माजी नगरसेवक संभाजी पवार, विनोद तरटे, इम्तियाज अली खान, प्रदीप पवार, नृसिंह हरणे, सतीश भोसले, जावेद पठाण, अमजद भाई आदींची उपस्थिती होती.
माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, माजी नगराध्यक्ष मारोती चव्हाण यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली. या वेळी प्रभाकर सुरवसे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद सावंत, मनीष कदम, गौतम धापसे, सचिन कोरडे, बबन गायकवाड, मोहन समुद्रे आदींची उपस्थिती होती.