आपला दवाखाना : सेलूतील श्री केशवराज बाबासाहेब यात्रेनिमित्त मोफत आरोग्य सुविधा

आपला दवाखाना : सेलूतील श्री केशवराज बाबासाहेब यात्रेनिमित्त मोफत आरोग्य सुविधा

शिवसेना वैद्यकिय कक्ष, डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, उपजिल्हा रुग्णालयाचा उपक्रम

सेलू जि.परभणी : येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या यात्रेनिमित्त ‘ आपला दवाखाना’ हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम मंगळवारी, ६ डिसेंबर रोजी सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे. शिवसेना वैद्यकिय कक्ष, डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, सेलू उपजिल्हा रुग्णालय, डॉ.प्रफुल्ल पाटील रुग्णालयातर्फे हा उपक्रम दहा दिवस राबविण्यात येणार आहे.
यात्रेनिमित्त मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी उसळते. अनेक छोटे मोठे व्यापारी यात्रेनिमित्त दाखल होतात. या भाविक भक्त व व्यापाऱ्यांसाठी शिवसेना वैद्यकिय कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन तसेच उपजिल्हा रुग्णालय, डॉ प्रफुल्ल पाटील रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोळा डिसेंबर पर्यंत मोफत आरोग्य सुविधा व औषधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या दवाखान्याचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी अरूणा संगेवार यांच्या हस्ते मंगळवारी झाले. प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्राचार्य शरद कुलकर्णी अध्यक्षस्थानी होते. या वेळी तहसीलदार दिनेश झांपले, माजी उपनगराध्यक्ष संदीप लहाने, ॲड. सुभेदार, जेष्ठ पत्रकार डी.व्ही.मुळे, प्रा नागेश कान्हकर आदींची उपस्थिती होती. डॉ.अजय बरसाले, डॉ.किरण सोनटक्के, श्याम साळुंके, बंडू देवधर, सदाशिव बर्वे, अभिजीत दळवे, मोहन पौळ, संतोष पडुळे, विलास काळे, बाळू राखुंडे, जाधव, बाळू शेरे, सुमीत भरदम आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक संयोजक डॉ.अनिकेत जोगदंड यांनी केले, सूत्रसंचालन भगवान पावडे, खापरखुंटीकर यांनी केले. आशिष काकडे यांनी आभार मानले.

आपला दवाखाना : सेलूतील श्री केशवराज बाबासाहेब यात्रेनिमित्त मोफत आरोग्य सुविधा

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!