महापरिनिर्वाण दिन : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच देश एकसंघ : डॉ.संजय रोडगे

महापरिनिर्वाण दिन : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच देश एकसंघ : डॉ.संजय रोडगे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना सेलूतील प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये अभिवादन

सेलू जि.परभणी : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्रीराम प्रतिष्ठान संचालित एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे म्हणाले,” डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच देश एकसंघ राहिला आहे.”
डॉ.संजय रोडगे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले, ” परिनिर्वाण म्हणजे मृत्यूनंतरचे निर्वाण. हे बौद्ध धर्माचे प्रमुख तत्व व ध्येय आहे. निर्वाण प्राप्त करण्यासाठी अत्यंत सद्गुणी व धार्मिक जीवन जगावे लागते.‌ भगवान बुद्धांच्या मृत्यूलाही महापरिनिर्वाण, असे म्हटले जाते. घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला ६६ वर्षे होत आहेत. त्यांनी दिलेल्या संविधानामुळेच भारत देश एकसंघ राहिला आहे. त्यामुळे एक चांगल्या प्रकारचे वातावरण समाजामध्ये बघायला मिळते आहे. सर्वधर्म समभाव हीच भूमिका घेऊन बाबासाहेबांनी शेवटपर्यंत त्यांची वाटचाल सुरू ठेवली.” या वेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव साबळे, प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्रॉस्परस इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य प्रगती क्षीरसागर, नारायण चौरे, अर्जुन राठोड, अरविंद वाटुरे, श्याम देशमुख, अर्जुन गरुड, बालाजी बामणे, विलास जाधव आदींची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!