राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धा : सेलूतील ‘प्रिन्स इंग्लिश’चे तीन खेळाडू राज्य संघात

राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धा : सेलूतील ‘प्रिन्स इंग्लिश’चे तीन खेळाडू राज्य संघात

सबज्युनियर व सिनियर मुला-मुलींचा महाराष्ट्र संघ जाहीर, डॉ.संजय रोडगे यांनी दिल्या संघाला शुभेच्छा

सेलू,जि.परभणी : राष्ट्रीय डॉजबॉल सबज्युनियर व सिनियर मुला-मुलींचा स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर करण्यात आला.डॉजबॉल असोसिएशन ऑफ महारास्ट्र व दि डॉजबॉल हौशी असोसिएशन औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय डॉजबॉल सबज्युनियर व सिनियर मुला-मुलींची निवड चाचणी मातोश्री रमाबाई हायस्कूल सिडको-७ औरंगाबाद येथे पार पडली. त्यात सेलूतील श्रीराम प्रतिष्ठान संचालित प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या शिवकन्या काळे , गीता माघाडे व लता घोगरे या तीन खेळाडूंची राज्य संघात निवड करण्यात आली.

निवड चाचणीचे उद्घाटन देवगिरी महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ.शेखर सिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त डॉ.रणजित पवार, महाराष्ट्र ग्रेपलिंग कुस्तीचे अध्यक्ष प्रा.राकेश खैरनार, परभणी जिल्हा सचिव आदित्य गायकवाड शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त तसेच सचिव डॉजबॉल असोसिएशन ऑफ महारास्ट्र प्रा.एकनाथ साळुंके हे उपस्थित होते. निवड चाचणी चालू असताना एलकेआरआर प्रिंन्स इंग्लिश स्कूल सेलूच्या तीन खेळाडूंनी चांगला, उत्कृष्ट असा प्रतिसाद देऊन लक्ष वेधले. यामध्ये शिवकन्या काळे , गीता माघाडे व लता घोगरे यांचा सहभाग आहे.  खेळाडूना बाद करण्याची संधी त्यांना दिली होती. यामध्ये त्यांनी तीनही वेळेस खेळाडूला बाद केले. निवड झालेले संघ या प्रमाणे आहेत.

सबज्युनियर मुली महाराष्ट्र संघ :- शिवकन्या काळे ( एल के आर आर प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू ) , गीता माघाडे ( एल के आर आर प्रिंन्स इंग्लिश स्कूल सेलू ) , सृष्टी अकोलकर ( औरंगाबाद ) , सिध्देश्वरी कपटे ( औरंगाबाद ) , समृद्धी शिंदे ( रायगड ) , दुर्बी मलिक ( मुंबई उपनगर ) , अंजली सातपुते ( औरंगाबाद ) , तपस्या दुबे ( रायगड ) , रिया तांबूस ( औरंगाबाद ) , गौरी पवार ( मुंबई उपनगर ) , स्नेहा पवार ( औरंगाबाद ) , हर्षदा कोलते ( औरंगाबाद )

सिनियर मुली महाराष्ट्र संघ :- गीता वेंळजकर ( औरंगाबाद ) , आरती घायवट ( औरंगाबाद ) , लता घोगरे ( एल के आर आर प्रिंन्स इंग्लिश स्कूल सेलू ) , वैष्णवी जाधव ( जालना ) , रुपाली मरस्कोले ( नागपूर ) , मुस्कान कांबळे ( अमरावती ) , अंतरा सिंघम ( मुंबई उपनगर ) , संध्या ससाणे ( औरंगाबाद ) , रॉयल राठोड ( नागपूर ) , वैशाली जाधव ( औरंगाबाद ) , वैशाली अटोलीकर ( नागपूर ) , सोनल सूर्यवंशी ( औरंगाबाद )

एलकेआरआर प्रिंन्स इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांनी निवड झालेल्या संघाला शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय स्पर्धेत  महाराष्ट्र संघाने यश संपादन करावे ; तसेच  शाळा, जिल्हा व महाराष्ट्राचे आणि आई वडिलांचा लौकिका वाढवावा, अशा शुभेच्छा डॉ.रोडगे यांनी दिल्या. अक्षय साळवे, क्रीडा शिक्षक , बालाजी कटारे, अनुसया यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्राचार्य प्रगती क्षीरसागर, प्रशासकीय अधिकारी महादेव साबळे उपस्थित होते

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!