श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय : आंतरशालेय सांस्कृतिक स्पर्धांना मोठा प्रतिपाद

श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय : आंतरशालेय सांस्कृतिक स्पर्धांना मोठा प्रतिपाद

श्री केशवराज बाबासाहेब महाराज यात्रेनिमित्त शाळेेचा उपक्रम,

सेलू, जि.परभणी :  येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाच्या वतीने आयोजित विविध आंतरशालेय सांस्कृतिक स्पर्धांना मोठा प्रतिसाद मिळाला. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी  मार्गदर्शन करतांना श्री.केशवराज बाबासाहेब शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य जयंत दिग्रसकर म्हणाले, की जीवनात स्पर्धेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यशस्वी होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने सहशालेय स्पर्धेत भाग घेतला पाहिजे. आपल्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध असले पाहिजे.

संत श्री केशवराज बाबासाहेब महाराज यात्रेनिमित्त बुधवारी आयोजित या उपक्रमांतर्गत रंगभरण, सामान्य ज्ञान, चित्रकला आणि निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी दत्तात्रय मंडलिक, श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिराचे पुजारी केशवराव मंडलिक, माजी मुख्याध्यापिका आश्रावंती हिवाळे, मुख्याध्यापक प्रदीप कौसडीकर, मुख्याध्यापक सुभाष नावकर आदींची उपस्थिती होती.
जयंत दिग्रसकर म्हणाले, आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत ,की आपल्याला केशवराज बाबासाहेब महाराजांच्या पावन भूमीत काम करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी कटीबद्ध व्हावे. प्रास्ताविक मंगेश कुलकर्णी, सूत्रसंचालन सुचिता पितळे, तर आभार योगेश ढवारे यांनी मानले. या वेळी विविध शाळेतील शिक्षक व पालकांची उपस्थिती होती. स्पर्धेसाठी शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय : आंतरशालेय सांस्कृतिक स्पर्धांना मोठा प्रतिपाद

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!