चारठाणकर संगीत महोत्सव : पणशीकरांच्या शिखर मैफील ठरली अविस्मरणीय; गायन, वादन, नृत्यांनी वेधले लक्ष
यशवंत चारठाणकरांचे गायन, कथ्थक, तबला सोलोवादनाने रसिक मंत्रमुग्ध
सेलू जि.परभणी : गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सवाची सांगता प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. रघुनंदन पणशीकर यांच्या “अवघा रंग एक झाला” या भैरवीने त्यांनी मैफलीची व महोत्सवाची सांगता केली. समारोहातीलॉ पणशीकरांची शिखर मैफील अविस्मरणिय राहिली.
दि. २५ व २६ रोजी येथील साईनाट्य मंदिरात हा सोहळा संपन्न झाला. शेवटच्या दिवशी पहिली मैफील यशवंतराव चारठाणकर यांची झाली.त्यांनी राग यमनचे प्रस्तुतीकरण केले. सौरभ कान्हेकर व शिवाजीराव पाठक यांनी त्यांना साथसंगत केली.. औरंगाबाद येथील एम.जी.एम महाविद्यालयातील विद्यार्थीनी व गुरू पार्वती दत्ता यांच्या शिष्या शितल भांबरे,राधा जहागीरदार, सिद्दी सोनटक्के यांचे कत्थकनृत्य झाले.युवतींच्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
बनारस घराण्याचे तबलावादक प्राचार्य रामभाऊ बोरगांवकर यांचा तबला सोलो वादन झाले. बनारस घराण्याचा बाज त्यांनी स्पष्ट केला.त्यांना लहेरासंगत मंगेश जवळेकर,गणेश बोरगांवकर यांची होती.
समारोहातील पं. पणशीकरांची शिखर मैफल अविस्मरणिय राहिली.सुरूवातीला त्यांनी राग “रागेश्री” गायला.त्यानंतर “सहेला रे” ही भुपालीची बंदिश सादर केली.रसिकांच्या अग्रहाखातर “पद्मनाभा नारायणा”हा अभंग सादर करून फर्माईश पुर्ण केली. “अवघा रंग एक झाला” भैरवीने त्यांनी मैफलीची व महोत्सवाची सांगता केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बागेश्री देशमुख, पूजा तोडकर यांनी, तर आभार श्रीकांत उमरीकर यांनी केले
.