सुरभी महोत्सव : नृत्यविष्काराने रसिक मंत्रमुग्ध, सेलूकरांची जिंकली मने
श्रीराम प्रतिष्ठानाचे आयोजन : प्राॅस्परस, ज्ञानतीर्थ, क्युरियस किड्स व एल के आर आर प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केली धम्माल
सेलू जि.परभणी : येथील श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सुरभी महोत्सवानिमित्त वैयक्तिक स्पर्धा रविवारी (25 डिसेंबर) साई नाट्य मंदिर येथे पार पडल्या. विद्यार्थ्यांच्या नृत्यविष्काराने रसिक मंत्रमुग्ध, 117 कलावंतांनी जिंकली सेलूकरांची मने जिंकली. वैयक्तिक नृत्य स्पर्धेत प्राॅस्परस, ज्ञानतीर्थ, क्युरियस किड्स व एल के आर आर प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कमाल धम्माल केली. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आयोजक तथा संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, वनविभाग अधिकारी अश्विनी रोडगे, डॉ. सुवर्णा नाईकनवरे, पोलिस उपनिरीक्षक भाग्यश्री पुरी, संस्थेच्या डॉ. सविता रोडगे, संस्थेचे मार्गदर्शक रामराव रोडगे, बाळासाहेब लिपणे, डॉ स्वरूपा शिंदे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेची सुरुवात द्विप्रज्वलनाने करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने प्राॅस्परस पब्लिक स्कूल, ज्ञानतीर्थ विद्यालय, क्युरियस किड्स व एल के आर आर प्रिन्स इंग्लिश स्कूल मधील एकूण ११७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. संस्थेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळावा या उद्देशाने या वैयक्तिक नृत्य स्पर्धेचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी केले होते. प्रत्येक विद्यार्थ्याने आपापल्या गीताचे उत्कृष्ट पद्धतीने सादरीकरण करत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
प्राॅस्परस पब्लिक स्कूल मधून वैयक्तिक नृत्य स्पर्धेत अ गटातुन राजवीर जोगदंड प्रथम, ब गटातुन संतोषी मिटकरी प्रथम तर भारगवी जानगर द्वितीय क गटातुन कार्तिक शिंदे प्रथम क्रमांक मिळविला. ज्ञानतीर्थ विद्यालय वैयक्तिक नृत्य स्पर्धेत गट अ मधून शिवश्री पडोळे प्रथम क्रमांकासह रोख ३००/- रु, भांबळे मनश्री द्वितीय क्रमांकासह २००/-, आकाश आदिश्री तृतीय क्रमांकासह रोख १००/- रु तर गट ब मधुन अनुष्का आचने प्रथम क्रमांकासह रोख ४००/- रु, तनुश्री कोल्हे द्वितीय क्रमांकासह ३००/-, वेदिका खंडागळे तृतीय क्रमांकासह क्रमांकासह रोख २००/- रु तसेच गट क रुद्र गोटमुकळे क्रमांकासह रोख ४००/- रु, कानेकर कृतिका द्वितीय क्रमांकासह ३००/-, मोहित सातपुते तृतीय क्रमांकासह रोख २००/- रू देऊन गौरविण्यात आले. क्युरिअस किड्स प्री स्कूल आद्या खजिने हिनेप्रथम क्रमांक, अर्पिता मेहता हिने द्वितीय तर रिद्धीशा रोडगे हिने तृतीय क्रमांक पटकावला. एल के आर आर प्रिन्स इंग्लिश स्कूल मधील प्रथम क्रमांक प्रेक्षा तोमशेट्टे, विश्वराज पोळ द्वितीय ओमकार खुडे, समृद्धी जैस्वाल, ज्ञानेश्वरी जाधव तृतीय क्रमांक कौस्तुभ शेळके, निहारिका मेहता अथर्व नंद यांना प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर टाके तर आभार प्रदर्शन आकात यांनी केले.
चारठाणकर संगीत महोत्सव : पणशीकरांच्या शिखर मैफील ठरली अविस्मरणीय गायन, वादन, नृत्यांनी वेधले लक्ष
झेडपीच्या : शिक्षकाची शाळेतच आत्महत्या, वर्गखोलीतच घेतला गळफास