झेडपीच्या : शिक्षकाची शाळेतच आत्महत्या, वर्गखोलीतच घेतला गळफास
परभणी जिल्ह्यातील धारासुरतांड्यावरील घटना, शैक्षणिक वर्तुळात खळबळ
परभणी : शाळेतील विद्यार्थ्यांना बिस्कीटासाठी शंभर रुपये देऊन वर्गखोलीत दोरीच्या साह्याने गळफास घेत एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने आपली जीवनयात्रा संपवली. गंगाखेड तालुक्यातील धारासुर तांड्यावरील जिल्हा परिषद शाळेमध्ये सोमवारी (२६ डिसेंबर) ही घटना घडली आहे. विठ्ठल अनंत रत्नपारखे ( रा.गंगाखेड) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण अजुन स्पष्ट झाले नाही. शिक्षक विठ्ठल रत्नपारखे सकाळी नेहमीप्रमाणे धारासुरतांडा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये गेले होते. शाळा उघडल्याने विद्यार्थी शाळेमध्ये आले. त्यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना बिस्किट खाण्यासाठी रत्नपारखे यांनी शंभर रुपये दिले. काही विद्यार्थ्यांनी बिस्किटासाठी दुकानावर धूम ठोकली, तर काही विद्यार्थी शाळेच्या मैदानामध्ये खेळत होते.पोषण आहार शिजवणारी महिला भांडी घासत होती. या वेळी शिक्षक विठ्ठल रत्नपारखे एका वर्ग खोलीमध्ये गेले. आत मधून दार लावले. नंतर वर्गखोलीमध्येच दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. बिस्किट घेऊन आल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी खिडकीमधून आत डोकावून पाहिले असता शिक्षक विठ्ठल रत्नपारखे यांनी आत्महत्या केली असल्याचे दिसून आले. माहिती समजल्यानंतर नागरिकांनी शाळेकडे धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच उपशिक्षणाधिकारी शौकत पठाण, गटशिक्षणाधिकारी बालाजी सगट यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली आहे. दरम्यान, विठ्ठल रत्नपारखे यांनी नेमक्या कोणत्या कारणाने आत्महत्या केली आहे. हे मात्र समजू शकलेले नाही.
सुरभी महोत्सव : नृत्यविष्काराने रसिक मंत्रमुग्ध, सेलूकरांची जिंकली मने
चारठाणकर संगीत महोत्सव : पणशीकरांच्या शिखर मैफील ठरली अविस्मरणीय गायन, वादन, नृत्यांनी वेधले लक्ष