हळदी कुंकू : अभिनेत्री तेजश्री प्रधान आज सेलूत; महिलांशी साधणार हितगुज
बोराडे परिवाराच्यावतीने सौभाग्य कार्यक्रमाचे आय़ोजन
सेलू,जि.परभणी : होणार सून मी या घरची, अग्गंबाई सासूबाई आदी टीव्ही मालिकांमधून झळकलेल्या प्रसिद्ध मराठी चित्रपट व दूरचित्रवाणी अभिनेत्री तेजश्री प्रधान बुधवारी ( २५ जानेवारी ) सेलू शहरात येत आहेत. सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत बोराडे परिवारातर्फे आयोजित सौभाग्य (हळदी कुंकू) या सांस्कृतिक कार्यक्रमात तेजश्री प्रधान सेलूतील महिलांशी मुक्त संवाद, हितगुज साधणार आहेत. शास्त्रीनगरातील बोराडे निवास येथे हा कार्यक्रम आहे. सौभाग्य कार्यक्रमास सेलू शहरातील महिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विजया मुकेशराव बोराडे, उर्मिला विनोदराव बोराडे व नयन साईराज बोराडे यांनी केले आहे.