श्रीरामजी भांगडिया व्याख्यानमाला : निशिकांत भालेराव यांचे सेलूत आज व्याख्यान
नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचा उपक्रम
सेलू जि.परभणी : येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमाल अंतर्गत भारतीय स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मतेला पूर्णत्व प्रदान करणाऱ्या हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बुधवारी ( २५ जानेवारी ) सायंकाळी ५.३० वाजता ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव यांचे व्याख्यान होत आहे. ‘हैदराबाद मुक्तिसंग्राम समजून घेताना ‘ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. श्री साई नाट्यगृहात आयोजित व्याख्यानास उपस्थित राहावे, असे आवाहन नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, चिटणीस प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, व्याख्यानमालेचे संयोजक प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, सहसंयोजक प्रा.सुभाष बिरादार यांनी केले आहे.