प्रजासत्ताक दिन : प्रिन्स, प्रॉस्परस, ज्ञानतीर्थ विद्यालयात विविध कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिन साजरा
डॉ.संजय रोडगे, भूषण कासट, डॉ.सविता रोडगे आदी मान्य़वरांची उपस्थिती
सेलू : येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल व जूनियर कॉलेज, ज्ञानतीर्थी विद्यालय, प्रॉस्परस स्कूल मध्ये ७४ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात संपन्न झाला. या निमित्त विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आय़ोजन करण्यात आले होते.
प्रिन्स इंग्लिश स्कूल मध्ये प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, प्रमुख पाहुणे भूषण कासट, प्रा.महादेव साबळे, प्राचार्य कार्तिक रत्नाला व शाळेतील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये नृत्य स्पर्धा,भाषण स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वीर क्रांतिवीरांची वेशभूषा स्पर्धा इत्यादी यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यावेळी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व या विषयी मान्यवरांनी विचार मांडले. अध्यक्ष डॉ संजय रोडगे यांनी संविधानाचे महत्त्व याविषयी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.देशभक्तीपर नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केली . यामध्ये देशभक्तीपर नारे देण्यात आले. प्रास्ताविक अर्जुनकुमार राठोड यांनी केले.सूत्रसंचालन कल्पना भाबट, अन्वेषा यांनी केले व आभार प्रदर्शन अर्जुन गरुड यांनी मानले.
ज्ञानतीर्थ विद्यालयात वर्गसजावट स्पर्धा
श्रीराम प्रतिष्ठान संचलित ज्ञानतीर्थ विद्यालय येथे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम विद्यालयाच्या प्रांगणावर उत्साहात पार पडला. ध्वजारोहण संस्थेच्या सचिव डॉ.सविताताई रोडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, संस्थेचे मार्गदर्शक रामरावजी रोडगे, मुख्याध्यापिका शालिनी शेळके, माध्यमिक विभागाचे करणसिंग चव्हाण, इंद्रजीत मोरे, दगडोबा माने तसेच विद्यार्थी प्रतिनिधी ऋतुजा आघाव व वैभव निर्वळ उपस्थित होते.
राष्ट्रगीतानंतर विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या भारताच्या नकाशाच्या प्रतिकृती द्वारे देशातील विविध राज्यातील वेशभूषा व तेथील प्रसिद्ध अन्न याविषयी माहिती विस्तृत माहिती सांगितली. याप्रसंगी बालवाडी गटातील मुला मुलींनी देशभक्तीपर गीतावर नृत्याचे सादरीकरण केले. पंजाब येथील भटिंडा येथे झालेल्या दहाव्या राष्ट्रीय मुलींच्या गतका स्पर्धेत शाळेतील ऋतुजा बनसोडे या विद्यार्थीनीला सब ज्युनिअर गटातुन ब्राॅझ मेडल प्राप्त केले याबद्दल संस्थेच्या सचिव डॉ.सविता रोडगे यांच्या हस्ते तिचे अभिनंदन केले. शाळेत वर्ग सजावट हा उपक्रम घेण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमावरील आधारित शालेय शैक्षणिक साहित्य स्वतः तयार करुन आणले होते. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वर्गातील विद्यार्थ्यांनी वर्ग सजावट केली. या शैक्षणिक साहित्यामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच अभ्यासासाठी फायदा होईल. या वर्ग सजावटीमध्ये उत्कृष्ट पद्धतीने सजावट केलेल्या वर्गांचे मान्यवरांच्या हस्ते कौतुक करण्यात आले. आताच शाळेत निवडणूक प्रक्रिया या उपक्रमांतर्गत निवडणूक आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधी वैभव निर्वळ व विद्यार्थिनी प्रतिनिधी. ऋतुजा आघाव यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय रोडगे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.
सूत्रसंचालन संजय ठाकरे यांनी केले.
प्रोस्परस पब्लिक स्कूलध्ये उत्साह
श्रीराम प्रतिष्ठान अंतर्गत प्रोस्पेरस पब्लिक स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला .यावेळी ध्वजारोहण रामरावजी रोडगे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे अध्यक्ष .डॉ.संजयजी रोडगे, मुख्याध्यापिका प्रगती क्षीरसागर, पालक प्रतिनिधी म्हणून लाभलेले गटकळ आदीसह पालक व शिक्षक वृंद उपस्थित होते. सूत्रसंचालन नवले यांनी केले,प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यविरांविषयीआपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून लक्ष वेधले. यशस्वीते साठी जाधव, सावंत, ताठे, हरदेकर ,मोरे ,नागरे, प्रियंका यांनी परिश्रम घेतले.
यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या भारताच्या नकाशाच्या प्रतिकृती द्वारे देशातील विविध राज्यातील वेशभूषा व तेथील प्रसिद्ध अन्न याविषयी माहिती विस्तृत माहिती सांगितली. याप्रसंगी बालवाडी गटातील मुला मुलींनी देशभक्तीपर गीतावर नृत्याचे सादरीकरण केले. पंजाब येथील भटिंडा येथे झालेल्या दहाव्या राष्ट्रीय मुलींच्या गतका स्पर्धेत शाळेतील ऋतुजा बनसोडे या विद्यार्थीनीला सब ज्युनिअर गटातुन ब्राॅझ मेडल प्राप्त केले याबद्दल संस्थेच्या सचिव डॉ.सविता रोडगे यांच्या हस्ते तिचे अभिनंदन केले. शाळेत वर्ग सजावट हा उपक्रम घेण्यात आला.
हेही वाचा : Motivational : सशक्त पिढीच सशक्त समाज घडविते : डॉ.अश्वमेध जगताप यांचे प्रतिपादन