बेमुदत उपोषण : सेलूतील २४ गाळ्यांचे बांधकाम थांबवा; मुख्याधिकाऱ्यांची बाजार समिती सचिवाला तंबी !

बेमुदत उपोषण : सेलूतील २४ गाळ्यांचे बांधकाम थांबवा; मुख्याधिकाऱ्यांची बाजार समिती सचिवाला तंबी !

न्यायप्रविष्ट वाद; तरीही बिनदिक्कत बांधकाम सुरूच, पार्किंगचे भविष्य अंधारात बेमुदत उपोषण : सेलूतील २४ गाळ्यांचे बांधकाम थांबवा; मुख्याधिकाऱ्यांची बाजार समिती सचिवाला तंबी !

सेलू : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये अनाधिकृतरित्या सुरू असलेले २४ गाळ्यांचे आणि पत्र्याच्या शेड बांधकाम प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, तरीही बिनदिक्कत बांधकाम सुरूच आहे. हे बांधकाम तात्काळ थांबवावे, या मागणीसाठी मंगळवारपासून (७ फेब्रुवारी) बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. सेलू येथील सहकारी संस्थेच्या सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले. सुजाण नागरिक अन्याय व भ्रष्टाचार विरोधी जनजागृती व निर्मुलन समितीचे श्रीनिवास राधाकिशन उघडे व सदस्यांचा उपोषणात सहभाग घेतला आहे. दरम्यान विना परवाना बांधकाम तात्काळ थांबवा; अन्यथा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी तंबी सेलूच्या मुख्याधिकाऱ्यांनी बुधवारी,आठ फेब्रुवारी रोजी बाजार समितीच्या सचिवाला पत्राव्दारे दिली आहे.
सेलू येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने मोंढा आवारामध्ये अनाधिकृत गाळे काढण्याचा सपाटा सुरूच ठेवला आहे. यामुळे मोंढा परिसरात शेतकऱ्यांच्या बैलगाडया व इतर वाहने लावण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. भविष्यात पार्किंगचे मोठी समस्या निर्माण होणार आहे. वाहतुकीसाठी रस्ता सुध्दा शिल्लक राहिलेला नाही. पालाशेड, शेतकरी भवन, व्यापारी संकुल, हमाल भवन हे सर्व कागदावरच आहे. जे काही गाळे काढले जात आहेत. एकापेक्षा जास्त गाळे गिळंकृत करून काही व्यापाऱ्यांनी मोठा व्यवसाय थाटला आहे. बाजार समिती परिसरात शेतकऱ्यांच्या मुलाला, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला किंवा सुशिक्षित बेरोजगाराला अथवा बचत गटाला दिल्या गाळे दिले जात नाहीत. जो कोणी सभापती किंवा प्रशासक येतो तो जास्तीत जास्त गाळे, कसे काढता येतील व त्यातून अमाप पैसा कमावून, कसे विकता येतील याच भूमिकेतून काम करतो, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. अनाधिकृत गाळे बांधकामाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, या संदर्भात शासनाकडे अनेक तक्रारी आहेत. तरीही २४ गाळ्यांचे व पत्र्याच्या शेडचे काम चालूच आहे. हे काम तात्काळ थांबवावे आणि तेथील साहित्य ताब्यात घ्यावे. जागा मोकळी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

दरम्यान, सेलू येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या २४ गाळ्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे गाळे विक्रीतील गैर व्यवहाराबाबतचा चौकशीचा अहवाल अंतीम करण्यात आला नाही, अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी विधीमंडळात प्रश्नोत्तराच्या तासात दिली होती. गाळे विक्री प्रकरणातील गैर व्यवहाराबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार सतिश चव्हाण,आमदार विक्रम काळे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. एवढा बोभाटा होऊन २४ गाळ्यांचे बांधकाम बिनधास्त सुरू आहे. तसेच या आधीच्या १२ गाळ्यांच्या बांधकामालाही हिरवा कंदील मिळविण्याचा प्रयत्न सर्वसंबंधितांकडून सुरू आहे. याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बाजार समितीच्या सचिवाला मुख्याधिकाऱ्यांची तंबी !

सेलू नगरपालिका क्षेत्रातील आमच्या अधिपत्या खालील कृषी उत्पन्न बाजार समिती क्षेत्रामध्ये ०१ ते २४ गाळ्याचे विनापरवाना बांधकाम करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. या कार्यालयाचे प्रमाणपत्र जा.क्र.२१३६/२०२१ दि. २०/०७/२०२१ अन्वये दिलेली बांधकाम परवागी नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ४८ अन्वये संपुष्टात आली असून सध्यस्थितीत आपण विनापरवाना बांधकाम करीत आहात. सदर बाब उक्त अधिनियमाच्या कलम ५२.५३ अन्वये दखलपात्र गुन्हा आहे. सबब आपण आपले अनधिकृत बांधकाम त्वरित थांबवून रीतसर बांधकाम परवानगी घ्यावी; अन्यथा आपल्या विरुद्ध महाराष्ट्र नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ५२, ५३ प्रमाणे फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंदवण्यात येईल, असे मुख्याधिकारी यांनी बुधवारी, आठ फेब्रुवारी रोजी पत्र देऊन बाजार समितीच्या सचिवाला कळविले आहे.


परभणी ऐतिहासिक वारसा : एक चित्रमालिका चित्रप्रदर्शनाचे सेलूत उद्घाटन

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!