गुणवंतांचे कौतुक : सेलूतील प्रॉस्परस स्कूलमध्ये विद्यार्थांचा सत्कार
सेलूतील श्रीराम प्रतिष्ठानचा उपक्रम
सेलू : श्रीराम प्रतिष्ठान संचालित प्रॉस्परस पब्लिक स्कूलमध्ये प्रेसिडेंशिअल टेस्टमधील गुणवंताचा गुरूवारी , नऊ फेब्रुवारी रोजी सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे होते. प्राचार्य प्रगती क्षीरसागर ,पालक प्रतिनिधी मधुकर जाधव, श्री.ढोले,श्री.आंबेकर, श्री.गजमल आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये सर्व मान्यवरांच्या हस्ते विजयी विद्यार्थ्यांना रॅंकनिहाय ऑरेंज, येलो कॅप घालून व पुष्पगुच्छ देऊन कौतुक करण्यात आले. या वेळी डॉ. संजय रोडगे यांनी पालकांना व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. मधुकर जाधव व श्री.ढोले यांनी अनुभव सांगितले. सूत्रसंचालन कुंदनांनी यांनी केले व आभार ताठे यांनी मानले.
बेमुदत उपोषण : सेलूतील २४ गाळ्यांचे बांधकाम थांबवा; मुख्याधिकाऱ्यांची बाजार समिती सचिवाला तंबी !