निबंध स्पर्धा : सेलू तालुकास्तरीय स्पर्धेत ईश्वरी काळे प्रथम; धामणगावच्या शाळेत सत्कार
इयत्ता आठवी ते दहावीच्या गटात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले
सेलू : तालुक्यातील गुगळी धामणगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेतील ईश्वरी विनोद काळे या विद्यार्थिनीने सेलू तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत, इयत्ता आठवी ते दहावीच्या गटात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे. ‘स्त्रियांचे आरोग्य’ या विषयावर ईश्वरीने निबंध लिहिला होता. या बद्दल शाळेतर्फे ईश्वरीचा सत्कार करण्यात आला. या वेळी सहायक पोलि्स उपनिरीक्षक श्री जटाळ , श्रीमती पुरी, पोलिस हवालदार श्री जानगर , श्रीमती मोरे, सरपंच अतुल डख, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बापुराव डख, गणेश कटकर, मुख्याध्यापक सोनकांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन जयंत नाईक यांनी केले, तर आभार अमोल बिडवे यांनी मानले. या वेळी श्रीमती बोथीकर, श्रीमती ढोले, श्रीमती बुरकुले, श्री कुशवाहा, श्री कटारे आदी उपस्थित होते.
गुणवंतांचे कौतुक : सेलूतील प्रॉस्परस स्कूलमध्ये विद्यार्थांचा सत्कार
बेमुदत उपोषण : सेलूतील २४ गाळ्यांचे बांधकाम थांबवा; मुख्याधिकाऱ्यांची बाजार समिती सचिवाला तंबी !