Pico Satellite : प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या व्हिजन खाडेची प्रक्षेपणसाठी निवड; पूर्वेश गुप्ताचा सहभाग

Pico Satellite : प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या व्हिजन खाडेची प्रक्षेपणसाठी निवड; पूर्वेश गुप्ताचा सहभाग

सेलूकरांसाठी अभिमानास्पद क्षण,  देशभरातून दीडशे जणांची निवड

Pico Satellite : प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या व्हिजन खाडेची प्रक्षेपणसाठी निवड; पूर्वेश गुप्ताचा सहभाग

सेलू : डॉ.एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुपतर्फे संपूर्ण देशातून शंभर विद्यार्थ्यांची दीडशे पिको सॅटॅलाइट लॉन्चिंग (Pico satellite launching) मिशन राबविल्या जात आहे. यामध्ये एकोणवीस फेब्रुवारीला पट्टी पुलम तामिळनाडू येथून सॅटॅलाइट रॉकेट सोडले जाणार आहेत. यात संपूर्ण देशातून 100 बाल वैज्ञानिकांची निवड राष्ट्रीय परीक्षा घेऊन केलेली आहे. या मध्ये सेलूतील एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या व्हिजन मारुती खाडे या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे.

या मिशनमध्ये संपूर्ण देशातून एकूण पाच हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. व्हिजन मारुती खाडे व पूर्वेस अनुप गुप्ता. येत्या 17 व 18 तारखेला हे दोन्ही विद्यार्थी चेन्नई येथील सॅटॅलाइट लॉन्चिंग प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी होतील. व 19 तारखेला पट्टीकुलम येथून त्यांनी स्वतः बनवलेला सॅटेलाईट लॉन्च करतील. या मिशनसाठी विद्यार्थ्यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड व शैक्षणिक शिष्यवृत्ती अशा अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आतापर्यंत प्रिन्सचे पाच विद्यार्थी या पुरस्काराने सन्मानित झाले आहे. या मिशनमध्ये सहभागी होण्याची प्रेरणा संस्थेचे अधयक्ष डॉ.संजय रोडगे यांच्या सतत मार्गदर्शनाने मिळाली. या मिशनसाठी विद्यार्थ्यांना नारायण चौरे, राजेंद्र देशमुख,असलम खान, अर्जुन गरुड यांनी मार्गदर्शन केले. 19 तारखेला पट्टीकुलम तामिळनाडू येथे सॅटॅलाइट लॉन्चिंगसाठी शाळेतील विद्यार्थी व्हिजन खाडे, पूर्वेश गुप्ता , मार्गदर्शक शिक्षक नारायण चौरे जाणार आहेत. शाळेच्या यशाचा झेंडा अवकाशात रोवणार आहेत. या ऐतिहासिक मोहिमेसाठी श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, सचिव डॉ.सविता रोडगे, डॉ.रामराव रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे, प्राचार्य कार्तिक रत्नाला, पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सुभेच्छा दिल्या.

19 तारखेला पट्टीकुलम तामिळनाडू येथे सॅटॅलाइट लॉन्चिंगसाठी शाळेतील विद्यार्थी व्हिजन खाडे, पूर्वेश गुप्ता , मार्गदर्शक शिक्षक नारायण चौरे जाणार आहेत. शाळेच्या यशाचा झेंडा अवकाशात रोवणार आहेत. या ऐतिहासिक मोहिमेसाठी श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, सचिव डॉ.सविता रोडगे, डॉ.रामराव रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे, प्राचार्य कार्तिक रत्नाला, पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सुभेच्छा दिल्या.


Scientific : जादूच्या प्रयोगात मुले झाली दंग; केमापूरच्या शाळेचा उपक्रम

JOIN NEWS UPDATE

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!