Scientific : जादूच्या प्रयोगात मुले झाली दंग; केमापूरच्या शाळेचा उपक्रम
एस.एस.सहेजाद यांच्या ‘जादूचे प्रयोग’ कार्यक्रमाला प्रतिसाद
सेलू : तालुक्यातील केमापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी गुरूवारी, नऊ फेब्रुवारी रोजी जादूच्या प्रयोगात दंग झाले होते. निमित्त होते एस.एस.सहेजाद यांच्या ‘जादूचे प्रयोग’ कार्यक्रमाचे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित व्हावा, हा कार्यक्रमाचा उद्देश होता. या वेळी मुख्याध्यापक शरद ठाकर, दिगंबर रोकडे, ज्ञानेश्वर इघारे उपस्थित होते. जादूगार सहेजाद यांनी विद्यार्थ्यांमध्ये एकरूप होऊन विविध जादूचे प्रयोग करून दाखवित, कुतूहल निर्माण केले. प्रत्येक जादूच्या प्रयोगामध्ये कशा प्रकारे हातचलाखी करण्यात येते हे उलगडून सांगितले. त्यासोबतच समाजात विविध भोंदूबाबा कशा प्रकारे फसवणूक करतात, हे सांगत समाजात कोणत्याही माणसाला जादू येत नाही. कष्टाला पर्याय नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करत अभ्यास करून यश मिळवले पाहिजे, असा सल्ला दिला. सूत्रसंचालन दगडोबा माघाडे यांनी केले, तर प्रणिता गाडे यांनी आभार मानले.
जादूगार सहेजाद यांनी विद्यार्थ्यांमध्ये एकरूप होऊन विविध जादूचे प्रयोग करून दाखवित, कुतूहल निर्माण केले. प्रत्येक जादूच्या प्रयोगामध्ये कशा प्रकारे हातचलाखी करण्यात येते हे उलगडून सांगितले. त्यासोबतच समाजात विविध भोंदूबाबा कशा प्रकारे फसवणूक करतात, हे सांगत समाजात कोणत्याही माणसाला जादू येत नाही. कष्टाला पर्याय नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करत अभ्यास करून यश मिळवले पाहिजे, असा सल्ला दिला.
Pico Satellite : प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या व्हिजन खाडेची प्रक्षेपणसाठी निवड; पूर्वेश गुप्ताचा सहभाग