अंगणवाडी : विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचा मोर्चा
मानधन वाढवा, शासकीय कर्मचार्यांचा दर्जा आदी मागण्यांचे निवेदन
परभणी : अंगणवाडी सेविका व मदतनीसांना शासकीय कर्मचार्यांचा दर्जा द्यावा, मानधन वाढीच्या आश्वासनाची पूर्तता करावी, ग्रॅज्यूटी वितरीत करावी, अंगणवाडी कर्मचार्यांना दरमहा पेन्शन द्यावी, केंद्रांचे भाडे वाढवून द्यावे आदीं प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत, या साठी जिल्हास्तरावरुनसुद्धा शिफारसी व्हाव्यात, या मागणीसाठी शुक्रवारी, दहा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद कार्यालयावर संतप्त अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी जोरदार मोर्चा काढला होता.
राज्यामध्ये दोन लाख कर्मचारी असून, अंगणवाडी सेविकांना दरमहा आठ हजार तीनशे रूपये, मिनी अंगवाडी सेविकांना दरमहा पाच हजार आठशे रूपये व मदतनीसांना दरमहा चार हजार दोनशे रुपये मानधन मिळत आहे. महाराष्ट्र शासन या मंडळींना मानसेवी समजतात. शासन त्यांच्याशी मालक-सेवक असे नाते मान्य करत नाही. या मंडळींना कामगार कल्याण कायद्याचे कोणतेही संरक्षण नाही. लाभ मिळत नाही. वाढता महागाई भत्ता मिळत नाही. त्यामुळे या अंगणवाडीसेविका व मदतनिसांच्या मनात शासनाविषयी तीव्र नाराजी निर्माण होत आहे. राज्यस्तरावरील मागण्याची राज्य शासनाने दखल घ्यावी व त्या मागण्या मान्य कराव्यात, अशी भूमिका स्पष्ट करीत जिल्हा अंगणवाडी व मदतनीस महासंघाने येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी दीडच्या सुमारास जोरदार मोर्चा काढला होता.
या मोर्चात मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका सहभागी होत्या. प्रशासनाला निवेदन देण्यात आले. अंगणवाडी सेविका व मदतनीसांना शासकीय कर्मचार्यांचा दर्जा द्यावा, मानधन वाढीच्या आश्वासनाची पूर्तता करावी, ग्रॅज्यूटी वितरीत करावी, अंगणवाडी कर्मचार्यांना दरमहा पेन्शन द्यावी, केंद्रांचे भाडे वाढवून द्यावे आदीं प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
अंगणवाडी सेविका व मदतनीसांना शासकीय कर्मचार्यांचा दर्जा द्यावा, मानधन वाढीच्या आश्वासनाची पूर्तता करावी, ग्रॅज्यूटी वितरीत करावी, अंगणवाडी कर्मचार्यांना दरमहा पेन्शन द्यावी, केंद्रांचे भाडे वाढवून द्यावे आदीं प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
आंदोलन : पत्रकार शशिकांत वारीशे हत्येचा परभणी, सेलूत निषेध; आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी
Scientific : जादूच्या प्रयोगात मुले झाली दंग; केमापूरच्या शाळेचा उपक्रम
Pico Satellite : प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या व्हिजन खाडेची प्रक्षेपणसाठी निवड; पूर्वेश गुप्ताचा सहभाग