महाशिवरात्री उत्सव : चैतन्य देवींच्या देखाव्याला सेलूकरांचा मोठा प्रतिसाद, ब्रह्माकुमारींचा उपक्रम
ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे आयोजन, मान्यवरांची उपस्थिती
सेलू : येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय केंद्राच्या वतीने चार दिवस आयोजित महाशिवरात्री उत्सवातील बारा ज्योतिर्लिंग दर्शन व चैतन्य देवींच्या सजीव देखाव्याला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
सेलू येथील श्री साईबाबा मंदिर सभामंडपात गुरुवारपासून (१६ फेब्रुवारी) माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या उपस्थितीत उत्सवाला सुरुवात झाली. रविवारी (१९ फेब्रुवारी) उत्सवाचा समारोप झाला. सायंकाळी सेलूभूषण उद्योजक जयप्रकाशजी बिहाणी, नंदकिशोरजी बाहेती, नवलकिशोरजी काबरा, श्रीवल्लभजी लोया, जेष्ठ पत्रकार राम सोनवणे, डॉ.विलास मोरे, लक्ष्मण बागल, दिलीप डासाळकर, रेवणअप्पा साळेगावकर, महमंद इलियास, इंजिनिअर बी.एस.कोलते, बाबासाहेब हेलसकर यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन झाले. या वेळी कांचन कोरडे, मोहसीन शेख, निसारखान पठाण, किशोर कटारे, अबरार बेग, बीके शांता बहेनजी, बीके सविता बहेनजी यांची उपस्थिती होती.
महोत्सवानिमित्त चार दिवस माता वैष्णोदेवी, लक्ष्मीमाता, गायत्रीमाता, सरस्वतीमाता, महाकाली, दुर्गामाता, भारतमाता, रेणुकामाता आदी चैतन्य देवींच्या रूपांचा सजीव देखावा साकारण्यात आला. सारिका बहेनजी, सान्वी हेलसकर, अहिल्या मोगल, प्रज्ञा तांबे, सारिका पवार, नेहा पद्मावत, श्वेता गबाळे, निकिता पद्मावत, गायत्री आकात, प्रियंका श्रीवास्तव, ममता मिटकरी, मीनाक्षी आकात, वैष्णवी आकात, स्वरा कापसे, गीतांजली मिटकरी आदींनी यामध्ये सहभाग घेतला. तक्षशीला मुळे हीने सादर केलेल्या तांडव नृत्याला, तर अहिल्या मोगल या चिमुकलीने सादर केलेल्या बंब बोले नृत्याला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. सूत्रसंचालन सीमा बहेनजी यांनी केले. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सेलू केंद्राच्या संचालिका बीके सविता बहेनजी, वैशाली बहेनजी (वालूर), सीमा बहेनजी (सातोना), राधा बहेनजी, योगिता बहेनजी, जया बहेनजी, सारिका बहेनजी, दीपा बहेनजी आदींसह ब्रह्माकुमारी परिवाराने पुढाकार घेतला.
उत्सवाला राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेक्षा भांबळे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे, राजेंद्र लहाने, उद्योजक आर.बी.घोडके, सुधाकर रोकडे, सेलू महिला मंडळाच्या ललिता गिल्डा, बीके अनिता बहेनजी यांनी भेट दिली. माऊंट अबूचे विठ्ठलभाई, ब्रह्माकुमारी बीके अर्चना बहेन, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, साईबाबा बँकेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, जयसिंग शेळके, साईराज बोराडे, डॉ.कैलास आवटे, ॲड.अजय आम्ले, सौ.आम्ले, मिलिंद पवार, गंगाधर आडळकर, मनीष कदम, राजू पौळ, राजेंद्र पवार, सुधाकर पवार, कांचन कोरडे, साधना पवार, मुळावेकर, ज्ञानेश्वर पवार यांनी उपस्थित राहून प्रोत्साहन दिले.
महोत्सवानिमित्त चार दिवस माता वैष्णोदेवी, लक्ष्मीमाता, गायत्रीमाता, सरस्वतीमाता, महाकाली, दुर्गामाता, भारतमाता, रेणुकामाता आदी चैतन्य देवींच्या रूपांचा सजीव देखावा साकारण्यात आला. सारिका बहेनजी, सान्वी हेलसकर, अहिल्या मोगल, प्रज्ञा तांबे, सारिका पवार, नेहा पद्मावत, श्वेता गबाळे, निकिता पद्मावत, गायत्री आकात, प्रियंका श्रीवास्तव, ममता मिटकरी, मीनाक्षी आकात, वैष्णवी आकात, स्वरा कापसे, गीतांजली मिटकरी आदींनी यामध्ये सहभाग घेतला. तक्षशीला मुळे हीने सादर केलेल्या तांडव नृत्याला, तर अहिल्या मोगल या चिमुकलीने सादर केलेल्या बंब बोले नृत्याला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली.